Nashik News | सुरत- चेन्नई महामार्गावर आडगाव जवळ होणार लॉजिस्टिक पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surat Chennai Greenfield Corridor Express Highway

नाशिक | सुरत- चेन्नई महामार्गावर आडगाव नजीक लॉजिस्टिक पार्क

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या १२२ किलोमीटरच्या सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गावरील (Surat Chennai Greenfield Express Highway) महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आली. लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अनुदानासाठी सादर केला जाणार असून, महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीयमंत्री गडकरी यांनी एका कार्यक्रमात नाशिकबद्दल प्रेम व्यक्त करताना शहर विकासात इकॉनॉमिक्स व इकोलॉजीचा समतोल राखण्याचे आवाहन केले. शहराचा विस्तार होत असताना वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यावर पर्याय म्हणून दिल्लीच्या धर्तीवर नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे आवाहन केले होते. मीरा भाईंदर, भिवंडी व बदलापूर येथे केंद्र सरकारकडून लॉजिस्टिक पार्कची अंमलबजावणी केली जात आहे. नाशिकमधून सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड मार्ग जात असल्याने या १२२ किलोमीटर महामार्गाच्या शहर परिसरात महापालिकेने जागा खरेदी करून रस्ते विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्यास लॉजिस्टिक पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरी दिले.

त्या अनुषंगाने स्थायी समिती सभापती गिते यांनी नगररचना व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या आडगाव शिवारात अनुक्रमे ५० व १३ एकर, असे एकूण ६३ एकर जागेत लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रस्तावित महामार्गालगत शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी पत्राद्वारे सादर केला. प्रस्तावाला कुठलाही विरोध न होता मान्यता देताना केंद्र सरकारकडे निधीसाठी तातडीने प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा: मालेगावात बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक

गॅरेजेस, वाहतुकीचे केंद्र

शहरात मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसेस तयार होत असल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणदेखील वाढत आहे. दिल्ली येथे १२ हजार कोटी रुपये खर्च करून महामार्गालगत लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्येदेखील लॉजिस्टिक पार्क होणार आहे. लॉजिस्टिक पार्क बरोबरच ट्रक टर्मिनस, गॅरेजेस, वाहतुकीचे केंद्र येथे विकसित केले जाणार आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गासाठी ९९६ हेक्टर भूसंपादन

loading image
go to top