Chhagan Bhujbal News : पावसाळ्यापर्यंत कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करा : मंत्री भुजबळ

येवला मतदारसंघाला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव-डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरणास २४२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Minister Chhagan Bhujbal inspecting the lining work of Punegaon-Dongargaon canal. Neighbor officials and officials.
Minister Chhagan Bhujbal inspecting the lining work of Punegaon-Dongargaon canal. Neighbor officials and officials. esakal

येवला : तालुक्यातील सिंचन वाढून दुष्काळ दूर होण्याच्या दृष्टीने मांजरपाडा प्रकल्प साकारला आहे. प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे.

हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करावे, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १४) अधिकाऱ्यांना दिल्या. (Chhagan Bhujbal statement Complete canal lining by monsoon nashik news)

येवला मतदारसंघाला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव-डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरणास २४२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मंत्री भुजबळ यांनी अंगुलगाव, न्याहारखेडे खुर्द, नगरसूल येथे दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरणासाठी ६३ किलोमीटरसाठी ९६ कोटींची तरतूद आहे. दरसवाडी ते डोंगरगावच्या ८७ किलोमीटर अंतर विस्तारीकरण, अस्तरीकरणासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत.

मशीनने कालवा लेव्हलचे काम सुरू आहे. कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्टचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या सात ठिकाणी काँक्रिट प्लांट उभारले आहेत. यासाठी २२ एक्सव्हेटर व दहा पेव्हर मशीनसह सुमारे ७०० कामगार काम करीत आहे.

Minister Chhagan Bhujbal inspecting the lining work of Punegaon-Dongargaon canal. Neighbor officials and officials.
Nashik: नाशिकचा GDP वाढीसाठी हवी दीड लाख कोटीची गुंतवणूक! जिल्हा प्रशासनाच्या पंचवार्षिक आराखड्यात खेळ आकड्यांचा

तिन्ही ठिकाणी भुजबळ यांनी यंत्रसामुग्रीची पाहणी केली व प्रात्यक्षिक पाहून माहिती घेतली. कामाचा दर्जा राखून येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, वसंत पवार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब लोखंडे, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ज्ञानेश्वर शेवाळे, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Minister Chhagan Bhujbal inspecting the lining work of Punegaon-Dongargaon canal. Neighbor officials and officials.
Nashik News : गारपीटग्रस्तांना 5 कोटींचा निधी! मंत्री भुजबळांकडून येवला, निफाड तालुक्यातील नुकसान मदतीचा आढावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com