esakal | जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार कराल तर लक्षात ठेवा..! - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal warn corona.jpg

केंद्र शासनाच्या 13 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत 'मास्क (2 प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-95 मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर' यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार कराल तर लक्षात ठेवा..! - भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  सध्यस्थितीत राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तु सहजासहजी व रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे. कोरोना व्हायरसने राज्यात थैमान घातले असताना जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. 

भुजबळ म्हणाले....
केंद्र शासनाच्या 13 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत 'मास्क (2 प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-95 मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर' यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

 क्लिक करा > VIDEO : जावईबापू म्हणतात.."मी गाढवावरून मिरवणार..सगळ्यांचीच जिरवणार" "शंभर वर्षांची प्रथा आहे हो!"

....तर संबंधित होणार कठोर कारवाई
दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तु अधिनियम, 1955 व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसचे संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

VIDEO : भयंकर प्रकार! निर्दयीपणे 'ते' तरुणाला भरचौकात मारत होते..अन् व्हिडीओ झाला व्हायरल.. 

loading image
go to top