Nashik News : छत्रपती सेनेकडकडून 21 फुटी कवड्यांची माळ; विश्वविक्रमासाठी नोंदणी

Officials of Chhatrapati Sena during the Puja by offering Kavdas from Kavdya Mala at the feet of Tuljabhavani Devi.
Officials of Chhatrapati Sena during the Puja by offering Kavdas from Kavdya Mala at the feet of Tuljabhavani Devi.esakal

जुने नाशिक : शिवजयंती निमित्ताने चार वर्षात सलग पाच विश्वविक्रम करण्याचा पराक्रम छत्रपती सेनेने केला आहे. यंदा त्यांनी शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या कवड्यांच्या माळेची २१ फुटी प्रतिकात्मक माळ तयार केली आहे. विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी सेनेकडून माळेची नोंदणी करण्यात आल्याची माहिती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी दिली. (Chhatrapati Sena 21 foot kavdyachi maal Registration for world record Nashik News)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध वस्तू साकारत विश्वविक्रम साकारण्याचा अनोखा उपक्रम या संस्थेकडून २०१९ पासून सुरू करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची भावी पिढीस माहिती व्हावी.

त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या वस्तूंचे महत्त्व याबाबत सर्व दूर माहिती पोचावी. हा उद्देश आहे. चार वर्षात त्यांच्याकडून पाच वस्तू तयार करण्यात आल्या आहे. त्यांची विश्वविक्रमात नोंद झाली आहे. आजही त्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहे.

यंदा छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेली कवड्यांच्या माळीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. महाराजांचे कुलदैवत तुळजाभवानी देवीचे रविवार कारंजा घनकर लेन येथील मोरे कुटुंबीयांचे प्राचीन मंदिरात माळेतील कवड्यांची रविवारी (ता.२९) विधीवत पूजा करून अभिषेक करण्यात आला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Officials of Chhatrapati Sena during the Puja by offering Kavdas from Kavdya Mala at the feet of Tuljabhavani Devi.
Success Story | जिद्द : 'ती'च्या पाणीपुरीच्या चवीने केली संघर्षावर मात!

कवड्यांची माळेचे वैशिष्ट्य

लॅकर कोटिंग कवडी रंगकाम नाशिकमध्ये करण्यात आले असून, अहमदाबाद (गुजरात) येथे कवडी तयार केली आहे. यासाठी सहा कारागिरांनी एका महिन्यात ही कवडी पूर्ण केली. तसेच, २१ फुटी माळेत ६४ कवड्यांचा वापर करण्यात आला असून कवडीची उंची १.२५ फूट आहे. तर वजन ७१ किलो आहे. ९० फूट १० कोलो दोरीचा वापर, ६१ किलो फायबरचा वापर करण्यात आला आहे.

यापूर्वीचे विश्वविक्रम

वर्ष - वस्तू

२०१९ - १३ फूट जिरे टोप

२०२० -१३ फूट तलवार

२०२१-६ फूट टाक

२०२२-६ फूट वाघनखे

२०२२- ८ फूट कटियार

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करत विश्वविक्रम केला जातो. यंदा कवड्यांची माळ तयार करण्याची संकल्पना सुचली." - नीलेश शेलार, कार्याध्यक्ष छत्रपती सेना

Officials of Chhatrapati Sena during the Puja by offering Kavdas from Kavdya Mala at the feet of Tuljabhavani Devi.
Nashik News : सावकाराला न घाबरता तक्रार करा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com