esakal | सावधान! आदिवासी भागात चिकनगुन्या फोफावतोय; रूग्णांनी खचाखच भरले दवाखाने
sakal

बोलून बातमी शोधा

Chikungunya

सावधान! आदिवासी भागात चिकनगुन्या फोफावतोय

sakal_logo
By
दिनेशचंद्र तायडे

मूलवड (जि. नाशिक) : पावसाळ्याच्या सुरवातीला आदिवासी भागात चिकनगुनिया या रोगाने तोंड वर काढले आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात भरपूर प्रमाणात गवत वाढले आहे त्यातच डासांचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू (Dengue), मलेरिया (malaria), चिकनगुनिया (chickenpox), ताप (fever) या साथीच्या रोगाचे रुग्ण ही वाढत आहेत. सध्या ठाणापाडा,कोटंबी, परीसरातील गावच्या गावं चिकनगुनियाने हैराण झाली आहेत. (chickenpox-patients-increases-in-tribal-areas-nashik-marathi-news)

रूग्णांनी खचाखच भरले दवाखाने

सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू झाले आहेत. चिकनगुनियाचे रुग्ण ताप व सांधेदुखी मुळे अंथरूणाला खिळून बसले आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परीसरातील नागरिक चिकनगुनिया मुळे त्रस्त झाले आहेत. दिवसागणिक एक एक गांव चिकनगुनियाने घेरले जात आहे. त्यामुळे संपूर्ण आदिवासी भागातील लोकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारी व खाजगी दवाखाने या रोगाने खचाखच भरली आहेत. त्यामुळे मूलवड बेरवळ, ओझरखेड, भागात चिकनगुनिया जवळ येत आहे. त्याला येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्या अगोदरच आरोग्य विभागाला व संबंधित ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी परीसरातील जनतेची मागणी आहे.

(chickenpox-patients-increases-in-tribal-areas-nashik-marathi-news)

हेही वाचा: नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच; अवघे 25 टक्केच लसीकरण

हेही वाचा: ॲम्‍फोटेरिसिनचा तुटवडा; त्यात अधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्‍या

loading image