esakal | नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच! शहरात अवघे 25 टक्के लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

nashik vaccination

नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच; अवघे 25 टक्केच लसीकरण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत अवघे २५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना झालेले लसीकरण पुरेसे नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केले जात आहे. (Only- 25-percent-vaccination-in-Nashik-city-marathi-news-jpd93)

पाच लाख नागरिकांना लस

१६ जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाकडून महापालिका व ग्रामीण भागामध्ये लशीचा पुरवठा करण्यात आला. प्रारंभी सरकारी कार्यालयातील कर्मचारी, आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वयोगटांपुढील सर्व व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. निर्णयात दुरुस्ती करत ४५ वयोगटापुढील सर्व व्यक्तींना लस देण्याची घोषणा करण्यात आली. १ मे २०१९ पासून १८ वयोगटापुढील सर्वांनाच लस देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, लशीचा अपुरा पुरवठा होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला. केंद्र व राज्य शासनाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. लसपुरवठा नेमका कोणी करायचा व त्याचे वितरण कसे करायचे, याबाबत नियमावली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर केंद्र सरकारने ७५ टक्के लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लसीकरण मोहीम सुरळीत झाली. ज्या व्यक्तींची नोंदणी कोव्हिन ॲपवर होते त्यांनाच लस दिली जाते. केंद्र सरकारने कारभार हाती घेतला तरी लशीचा पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. वीस लाख लोकसंख्या गृहीत धरल्यास ही टक्केवारी अवघी २५ टक्के आहे.

कोव्हॅक्सिनचे ७० हजार डोस

शहरात पहिला डोस घेणारे तीन लाख ७७ हजार ६०४ नागरिक असून, दुसरा डोस घेतलेले एक लाख १७ हजार १४३ लोक आहेत. मागील दोन दिवसांत पाच लाख दोन हजार ७४७ नागरिकांना डोस देण्यात आले. नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच असून, पहिला डोस घेतलेले तीन लाख ३७ हजार ५८६, तर दुसरा डोस घेतलेले ८६ हजार ३२९ नागरिक आहेत. कोव्हिशील्डचे एकूण चार लाख २३ हजार ९१५ डोस झाले आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले ४० हजार १८ नागरिक असून, ३० हजार ८१४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचे एकूण ७० हजार ८३२ डोस झाले आहेत.

हेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

केंद्रे भरपूर, लस मात्र नाही

महापालिकेकडून शहरात ४१ लसीकरण केंद्रांची घोषणा करण्यात आली, मात्र आजी-माजी नगरसेवकांकडून केंद्रांची मागणी वाढली. सध्या ११० केंद्रांना मान्यता देण्यात आली असली तरी जेवढ्या लशी उपलब्ध होतील त्याचे समान वितरण करूनच मोहीम राबविली जाणार असल्याने एका केंद्रावर साधारण ५० ते १०० लस उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा: नगरसेविका जाधव जेव्हा धामण हाती घेतात...एक थरारक प्रसंग

loading image