esakal | ॲम्‍फोटेरिसिनचा तुटवडा; त्यात अधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्‍या! दिलासा मात्र नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

amphotericin

ॲम्‍फोटेरिसिनचा तुटवडा; त्यात अधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्‍या

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : राज्‍यासह जिल्‍हाभरात म्‍युकरमायकोसिसच्‍या रुग्‍णांच्‍या उपचारासाठी ॲम्‍फोटेरिसिन बी इंजेक्‍शनची आवश्‍यकता आहे. आधीच तुटवड्याचा प्रश्‍न गंभीर असताना अन्न व औषध प्रशासनातर्फे केवळ अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करत धन्‍यता मानली आहे. त्‍यामुळे इंजेक्‍शनचा मुबलक पुरवठा झाल्‍यावर रुग्‍ण, त्‍यांचे नातेवाईक व वैद्यकीय क्षेत्राला दिलासा मिळू शकणार आहे. (deficiency-amphotericin-Appointment-of-officers-marathi-news-jpd93)

अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय, दिलासा मात्र नाहीच

ॲम्फोटेरिसिन आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेता, अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) सूचना जारी केली आहे. औषधांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी त्यांचे नियंत्रण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्‍यानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत असल्‍याचे या सूचनेत जारी केले आहे. यापूर्वीच जिल्‍हा प्रशासनातर्फेदेखील नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केलेली आहे.

दरम्‍यान, सुरवातीपासूनच नाशिक जिल्ह्यात ॲम्‍फोटेरिसिन इंजेक्‍शनचा तुटवडा आहे. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नुकत्याच झालेल्‍या आढावा बैठकीत चिंता व्‍यक्‍त केली होती. अशात केवळ अधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍तीने हा प्रश्‍न सुटेल का, असा संतप्त प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे. दरम्‍यान, अन्न व औषध प्रशासनातर्फे जारी निर्णयानुसार नाशिक विभागासाठी सहआयुक्‍त दुष्यंत भामरे यांची नोडल अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. जिल्हास्तरावरही औषधांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्‍ला दिला आहे.

हेही वाचा: शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावाने धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

हेही वाचा: शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्‍या कोर्टात

loading image