

नाशिक: हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ध्रुव राजपूत (वय ५) असं या चिमुकल्याचे नाव असून चारचाकी वाहनाच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.