esakal | सावकीत कुटूंबावर नियतीचा घात; भिंत कोसळून गाढ झोपेतच चिमुकल्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

child died due to  wall collapsed

सावकी येथे नियतीचा आघात; भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

sakal_logo
By
खंडु मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाचवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सावकी येथील आदिवासी वस्तीतील कुटुंबिय झोपेत असतांना रात्री साडेबाराच्या सुमारास घटना घडली आहे. (child-died-due-to-wall-collapsed-nashik-maraythi-news)

गाढ झोपेतच चिमुकल्याचा अंत

देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. गुरूवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या भिंतीत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत रात्री साडेबाराच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या पठाण सोनवणे, पत्नी सुनीता, पाच वर्षीय मुलगा आकाश व सात वर्षीय मुलगा कुणाल यांच्या अंगावर कोसळली. घर कोसळल्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावत आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात नेले. पाच वर्षीय आकाशचा वाटेतच मृत्यू झाला. तर, सुनीता (वय २७) व कुणाल (वय ७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पठाण सोनवणे (वय २९) याला किरकोळ दुखापत झाली आहे. तलाठी कल्याणी कोळी, ग्रामसेवक वैशाली पवार यांनी घटनेचा पंचनामा केला असून, शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(child-died-due-to-wall-collapsed-nashik-maraythi-news)

हेही वाचा: कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं महाग

हेही वाचा: कोरोनाने पुसले ५९९ महिलांचे कुंकु, ४६ बालकांनी गमावले दोन्ही पालक

loading image