नाशिक : कमी वयात रेशीम गाठ बांधणाऱ्यांचा रोखला विवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage stpped

नाशिक : कमी वयात रेशीम गाठ बांधणाऱ्यांचा रोखला विवाह

नाशिक : लग्नसराई धुमधडाक्यात सुरु असताना अल्पवयीन (Minor) मुले-मुलींच्या लग्नाचा धडाका चाललाय. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन आठवड्यात अल्पवयीन मुलींचे विवाह एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने रोखले. आज कावनाई (ता. इगतपुरी) येथे कमी वयात रेशीम गाठ बांधण्यासाठी तयार झालेल्या मुलाचे लग्न रोखण्यात आले. (child marriage stopped by Anganwadi Sevikas at igatpuri NashIk News)

अंगणवाडी सेविका लग्नाच्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांसमवेत पोचल्या. त्यावेळी मुलीचे वय २० वर्षे आणि मुलाचे वय १८ वर्षे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कायद्यानुसार मुलाचे लग्नाचे वय नसल्याने लग्न करण्यात येऊ नये, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. लग्न न करण्याबद्दल सांगूनही ऐकले नाही, तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असे खडे बोल सुनावण्यात आल्यावर ‘आम्ही लग्न लावत नाही’, असे सांगत वऱ्हाडी मंडळींनी कार्यस्थळावरुन काढता पाय घेतला. पण तरीही वऱ्हाडी मंडळी परत येऊन लग्न लावू नये म्हणून कर्मचारी थांबून राहिले. अखेर सायंकाळपर्यंत परत कुणीही न आल्याने कर्मचारी घराकडे परतले.

हेही वाचा: नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध

करार पद्धतीचे लग्न

लग्नासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये स्नेहबंध राहिला आहे. त्यामुळे दोन्ही घरच्यांनी करार पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लग्न लावण्यासाठी वऱ्हाडी मंडळी येणार असल्याची माहिती मिळताच, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लग्न थांबवण्यासाठी पाठवून दिले होते.

हेही वाचा: Success Story : सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाची 'गरूडझेप'

Web Title: Child Marriage Stopped By Anganwadi Sevikas At Igatpuri Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top