Nashik Police: पोलिसांमुळे चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत; भिक्षेकरी महिलेने गोदाघाटावरून पळविले होते

लहान मुलांचे अपहरण करून त्यांचा भिक्षा मागण्यासाठी वापर केला जात असल्याची चर्चा नेहमीच होत असते
A child taken from the custody of a beggar woman in his mother's arms. Along with the police team of Bhadrakali. inset suspected female beggar
A child taken from the custody of a beggar woman in his mother's arms. Along with the police team of Bhadrakali. inset suspected female beggaresakal

नाशिक : लहान मुलांचे अपहरण करून त्यांचा भिक्षा मागण्यासाठी वापर केला जात असल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, भद्रकाली पोलिसांमुळे अशीच एक घटना उघड आली आहे.

गोदाघाटावर राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दाम्पत्याची नजर चुकवून भिक्षेकरी करणाऱ्या महिलेने चिमुरडीला पळविले. मात्र गस्तीवर असलेल्या भद्रकाली पोलीसांनी भिक्षेकरी महिला अन्‌ चिमुरडीचा पेहराव, चेहरा जुळत नसल्याने चौकशी केली अन्‌ तिचा भांडाफोड झाला.

अखेर चिमुरडीला ताब्यात चौकशीअंती तिच्या आईच्या कुशीत हसताना पाहून पोलिसांच्याही चेहऱ्यावर समाधानाची लकेर होती. (Child returned to mothers due to police beggar woman abducted minor from Godaghat Nashik crime)

सुनिता अशोक काळे (४५, रा. नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर) असे चिमुरडी मुलीला पळविणाऱ्या संशयित भिक्षेकरी महिलेचे नाव आहे. गेल्या सोमवारी (ता. २२) शहरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त व बंदोबस्त तैनात होता.

भद्रकाली पोलिस ठाण्याचे गस्ती पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथक हद्दीत गस्तीवर होते. पिंपळ चौक परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास पथक गस्तीवर असताना, एक भिक्षेकरी महिला सुमारे एका वर्षाच्या चिमुरडीसोबत दिसली.

तिच्याकडे पाहिल्यानंतर तिचा चेहरा व पेहराव आणि तिच्याकडील चिमुरडीचा पेहराव आणि चेहरा यात खुपच फरक होता. त्यामुळे पथकाचे अंमलदार नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपने, महेशकुमार बोरसे यांचा संशय आला.

त्यांनी संशयित भिक्षेकरी महिलेला रोखले आणि तिच्याकडे चौकशी केली असता, ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तिच्याकडील चिमुरडी कोण आहे, असे विचारले असता तिने माझी मुलगी असल्याचे सांगितले.

महिला पोलीसांचे पथक बोलावून तिची चौकशी सुरू केली. तिच्याकडे असलेल्या चिमुरडीचे नाव विचारले तर तेही तिला ठाऊक नव्हते. त्यामुळे चिमुरडी ताब्यात घेत तपासले असता तो मुलगा असल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून पोलिसांनी खाक्या दाखविताच संशयित भिक्षेकरी महिलेने चिमुरड्यास गोदाघाटावरून पळविल्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित भिक्षेकरी महिलेला अटक करण्यात आली असून, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A child taken from the custody of a beggar woman in his mother's arms. Along with the police team of Bhadrakali. inset suspected female beggar
Pune Crime News : मोबाईल चोरणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्यास अटक, १७ मोबाईल जप्त

पालकांकडे स्वाधीन

आडगाव परिसरातील बळी मंदिर चक्रधर नगर भागात राहणारे कांबळे कुटूंबिय सोमवारी (ता. २२) राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने गोदाघाट परिसरामध्ये सायंकाळी आले होते.

त्यावेळी संशयित भिक्षेकरी महिलेने गोदाघाटावरील गर्दीचा गैरफायदा घेत कांबळे कुटूंबियांची नजर चुकवून त्यांचा विकी या मुलास पळविले. पालकांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून न आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

भद्रकाली पोलिसांनी याबाबत पंचवटी पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर माहिती मिळाली. त्यानुसार पालकांना बोलाविण्यात आले.

ओळख पटविल्यानंतर विकीला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. विकीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून पोलिसांच्याही चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. पालकांनी पोलिसांचे आभार मानले. तर पोलीस आयुक्तांनीही पथकाच्या कामाचे कौतूक केले.

A child taken from the custody of a beggar woman in his mother's arms. Along with the police team of Bhadrakali. inset suspected female beggar
Nashik Crime News : शहर, परिसरातून 75 हजाराचा गुटखा जप्त; 5 जणांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com