Nashik News: राजहंस, बदकांसह चायनीज कोंबड्या विक्रीसाठी; उत्तरप्रदेशातून व्यावसायिक कसमादेत दाखल

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथून जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात राजहंस, बदक, चायनीज कोंबड्या विक्रीसाठी आल्या आहेत
Manoj Kumar Sonkar selling chickens, swans and ducks brought from Prayagraj.
Manoj Kumar Sonkar selling chickens, swans and ducks brought from Prayagraj. esakal

नरकोळ : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथून जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात राजहंस, बदक, चायनीज कोंबड्या विक्रीसाठी आल्या आहेत. बदक, कोंबड्या खरेदी आणि हे पक्षी पाहण्यासाठी नागरिक देखील गर्दी करत आहे. (Chinese chickens for sale including swans ducks Entered into Professional Vocation from Uttar Pradesh Nashik News)

शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी, दुग्ध व्यवसाय, शेतीपालन, कुकुटपालन आदी व्यवसायाकडे वळाले आहे. महाराष्ट्रातील कोंबडी पोल्ट्री व्यवसायप्रमाणे प्रयागराजमधये बदक, राजहंस आणि चिनी कोंबड्या यांचे फार्म आहेत.

याच पक्षाची विक्री महाराष्ट्रात करण्याच्या उद्देशाने प्रयागराज येथील व्यावसायिक कसमादे पट्ट्यात दाखल झाले आहे. गावागावत मिळेल त्याठिकाणी हे व्यावसायिक पक्षांची विक्री करीत असून या पक्ष्यांमध्ये चायनीज कोंबड्या देखील नागरिकांना पहावयास मिळत आहे. हौशी शेतकरी आवर्जून या कोंबड्या खरेदी करीत आहे.

कोंबडीपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० जास्त अंडी देतात. त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक द्रव्ये असतात.

त्यामुळे बदकांना चांगला प्रतिसाद या व्यावसयिकांना मिळत आहे. बदकासह राजहंस देखील विक्रीला आहे. यासह चायनीज कोंबडीला देखील चांगला प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत आहे. ही कोंबडी पाच महिन्यांची झाल्यानंतर रोज एक अंडी देते.

त्याचा रंग लाल असतो. सहा महिन्यांनंतर या कोंबडीचे वजन चार ते पाच किलोपर्यंत वाढते. देशी कोंबडीपेक्षा या कोंबडीची अंडी आकाराने मोठी असतात.

Manoj Kumar Sonkar selling chickens, swans and ducks brought from Prayagraj.
SAKAL Exclusive: नांदगावची वाहतूक कोंडी वाढणार! शिऊर बंगलाकडील वाहतूक नांदगावमार्गे वळविण्याच्या प्रस्ताव

असे आहेत पक्ष्यांचे दर :

राजहंस : चार हजार पाचशे रुपये

बदक : एक हजार रुपयाला जोडी

चायनीज कोंबड्या : ८०० रुपयाला जोडी

"प्रयागराज येथून आम्ही हे पक्षी विक्रीसाठी आणले आहेत. अनेक शेतकरी शेतात पक्षी पाळण्यासाठी घेत आहे."- मनोजकुमार सोनकर, प्रयागरा

Manoj Kumar Sonkar selling chickens, swans and ducks brought from Prayagraj.
Nashik: 4 वर्षांत एकही तंटा पोलिस ठाण्याला न गेलेले मौजे सुकेणे! 125 तंटे मुक्त केलेली तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com