Leopard
sakal
नवीन नाशिक: जुने सिडको आणि कामटवाडे परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे वास्तववादी; पण बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या अफवेमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडणेही टाळले. अखेर, वन विभागाने सिडको परिसरात बिबट्याचे कोणतेही अस्तित्व नसून, सदर फोटो बनावट असल्याचे स्पष्ट केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.