नातेवाइकांची मृत्यू दाखल्यांसाठी वणवण; वारंवार सर्व्हर डाउन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

मृत्यूच्या दाखल्यासाठी पहिल्यांदा झेरॉक्स मिळविण्यापासून अडचण येते. मृतदेह ताब्यात घेताना मृताच्या आधार कार्डापासून तर अंत्यविधीसाठी मृतदेह नेल्यानंतर तेथे नोंदणीसाठीच्या कागदपत्रापर्यत किमान तीन झेरॉक्स लागतात.

नातेवाइकांची मृत्यू दाखल्यांसाठी वणवण; वारंवार सर्व्हर डाउन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, कोरोनाबाधित कुटुंबाच्या समस्या काही संपलेल्या नाही. रुग्णवाढीचा वेग जोरात असताना ऑक्सिजन मिळवताना मारामारी होती. त्यानंतर इंजेक्शनसाठी धावाधाव करावी लागली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असताना मृत्यूच्या दाखल्यासाठी (death certificate) वणवण करावी लागत आहे. (Citizens have to face many difficulties to get a death certificate)

झेरॉक्सपासून अडचण

मृत्यूच्या दाखल्यासाठी पहिल्यांदा झेरॉक्स मिळविण्यापासून अडचण येते. मृतदेह ताब्यात घेताना मृताच्या आधार कार्डापासून तर अंत्यविधीसाठी मृतदेह नेल्यानंतर तेथे नोंदणीसाठीच्या कागदपत्रापर्यत किमान तीन झेरॉक्स लागतात. मृत्यूचे प्रमाणपत्र, मृतांचे आधारकार्ड आणि महापालिकेच्या विहित नमुन्यातील अर्ज यांच्या झेरॉक्स काढायच्या तर दुकान तर उघडी हवीत. मृतदेह ताब्यात घेताना तसाच मृतदेह ठेऊन मृताच्या नातेवाइकांना झेरॉक्स दुकान कुठे उघडे आहे, याची शोधाशोध करावी लागते.

रुग्णालयाकडून विलंब

दुसरी प्रमुख अडचण आहे, रुग्णालयाकडून मृतांच्या नोंदीची माहिती महापालिकेकडे येण्यास विलंब होतो. डॉ. झाकिर हुसेन किंवा बिटको रुग्णालयातील मृत्यूबाबत माहिती महापालिकेला त्वरित उपलब्ध व्हायला हवी, परंतु तेही होत नाही. खासगी रुग्णालयांची अडचण आणखी वेगळी ठराविक रुग्णालय सोडली तर कोरोना मृत्यूची माहिती महापालिकेला वेळेत मिळत नसल्याने रोज अनेकांना चकरा माराव्या लागतात. रुग्णालयाकडून माहितीच आली नाही, हे उत्तर कायम ऐकावे लागते. रुग्णांच्या मृतदेह ताब्यात घेताना बिल काढले जाते. तेव्हाच सगळा विषय संपायला हवा पण त्यानंतर खासगी रुग्णालयाकडून सोयीने मृतांची माहिती पाठविली जात असल्याने विलंब वाढतो.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

तीन दिवसांपासून अडचणी

तिसरी नेहमीची अडचण आहे, ती सर्व्हर डाउनची. जन्माप्रमाणे मृत्यूच्या नोंदीचे सर्व्हर डाउन होण्याचे प्रमाण मोठे आहे. सध्याही जवळपास तीन दिवसांपासून सर्व्हरला अडचणी आहे. वारंवार सर्व्हर डाउन होत असल्याने दाखले तयार होत नाही. बाहेर लॉकडाउन असल्याने मृतांच्या नातेवाइकांना दाखल्यासाठी चकरा मारणे सोयीचे होत नाही. पोलिस बंदोबस्तात विनाकारण चकरा मारण्‍याच्या कारणावरून दंडुक्याचा प्रसाद काहींना खावा लागला.

- वारंवार ऑनलाइन अर्जाच्या सर्व्हर डाउनचा प्रश्न

- मृतांची माहिती मिळविण्यास रुग्णालयाकडून विलंब

- मृत्यू दाखल्‍यासाठी अर्ज करायला झेरॉक्सचा वाणवा

- शहराबाहेर अंत्यविधी झालेल्यांची दाखल्याची व्यथा

(Citizens have to face many difficulties to get a death certificate)

हेही वाचा: नेमबाज मोनाली गोऱ्हेंचे कोरोनाने निधन; नाशिकमध्ये शोककळा

loading image
go to top