सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; गुढीपाडव्यापेक्षा दुप्पट गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Shop

सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; गुढीपाडव्यापेक्षा दुप्पट गर्दी

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेचा (Akshay Tritiya) औचित्य साधून सोने (Gold) खरेदीसाठी नाशिककरांनी सराफी दुकानामध्ये एकच गर्दी केली. कोरोना महामारीनंतर प्रथमच मोकळीक मिळत असल्याने नाशिककरांनी या वेळी बाजारपेठेत या संधीचा पुरेपूर आनंद घेत बाजारपेठांमध्ये मनसोक्त खरेदी केली. लग्नसराई (Wedding Season) आणि त्यातच अक्षयतृतीया हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने यंदा पहिल्यांदाच अक्षयतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी गुढीपाडव्यापेक्षाही (Gudi Padwa) अधिक गर्दी होती.

अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळेच या दिवशी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. यातच लग्नसराईदेखील जोरात सुरू असल्याने सोने खरेदीसाठी लोकांची सराफी दुकानांवर गर्दी होवू लागली आहे. यातच अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी केल्याने अनेक सराफी पेढ्यांवर एकच झुंबड उडाली. यावेळी खास करून तयार दागिन्यांना विशेष मागणी होत. यात सोन्याचे बिस्कीट, नाणे, वेढा, सोनसाखळी, बांगड्या, कानातील झुमके, गंठण, अंगठ्या, विविध दागिने आदींची जोरदार विक्री झाली. अक्षयतृतीयेनिमित्त यावेळी अनेक सराफी व्यावसायिक यांच्याकडून सोने घडवळीवर भरघोस सूटही देण्यात आली होती. या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात सोने खरेदीत कोट्यवधीची उलाढाल झाल्याचेही यावेळी व्यावसायिकांनी सांगितले.

हेही वाचा: शेतकऱ्याचे अनोखे ‘अश्वनृत्य’; आदिवासींची संस्कृती टिकविण्यासाठी धडपड

एसी, कुलर, फ्रिजला वाढती मागणी

सोने बाजारपेठेसह इलेक्ट्रिक वस्तु, गॅझेट खरेदीसाठी लोकांनी अक्षयतृतीयेचा मुहूर्त गाठला. वाढता उन्हाळ्यामुळे खासकरून लोकांकडून एसी, कुलर आणि फ्रिजला अधिक मागणी होती. शहरातील विविध इलेक्ट्रीक दुकानांमध्ये दुपारनंतर या वस्तु खरेदीसाठी गर्दी झाली. अक्षयतृतीयेचा औचित्य साधून तरुण वर्गाकडून स्मार्टफोन, लॅपटॉप आदी गॅझेटची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

हेही वाचा: Malegaon : हनुमान चालिसा पठणासाठी तुर्तास कुणाचाही अर्ज नाही

"दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंध नसल्याने बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाची वाढती तीव्रतेमुळे अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत लोकांकडून फ्रिज, एसी आणि कूलरची अधिक मागणी असून खरेदी केली जात आहे."

- ओम वाणी, संचालक, ओमपूजा इलेक्ट्रॉनिक्स

Web Title: Citizens Rush To Buy Gold Occasion Of Akshaya Tritiya Nashik Akshay Tritiya News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top