
Malegaon : हनुमान चालिसा पठणासाठी तुर्तास कुणाचाही अर्ज नाही
मालेगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंगे उतरविण्यासाठी ४ मेची मुदत दिली आहे. भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोरील (Masjid) मंदिरात महाआरती व हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याच पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी सांगितले. हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी मागणारा कुठलाही अर्ज मालेगाव उपविभागात आला नसल्याचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.
हेही वाचा: सातपूर परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न
शहरासह परिसरात रमजान ईद (Ramzan Eid) व अक्षयतृतीयानिमित्त (Akshay Tritiya) असलेला बंदोबस्त कायम आहे. पोलिस प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मालेगावसह उपविभागात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. मात्र, मनसे अथवा कुठल्याही संस्था, संघटनेतर्फे हनुमान चालिसा पठण, महाआरतीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांकडे आलेला नाही. मुळातच शहरातील बहुसंख्य मशिदी पूर्व भागात, तर मंदिरे पश्चिम भागात आहेत. पाच ते सहा मशिदीनजीकच मंदिरे आहेत. अशा ठिकाणी पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबरच सोशल मीडियावरील (Social Media) संदेश व समाजकंटकांवरही सायबरसेल, साध्या वेशातील पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस लक्ष ठेवून आहेत. एकूणच भोंग्यावरून राजकारण तापले असले, तरी तूर्त हनुमान चालिसा पठण व महाआरती नसल्याने कुठलाही वाद उद्भवणार नाही, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: नाशिकमध्ये आजान विरोधात पहाटेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन
Web Title: There Is No Application Filed For Reciting Hanuman Chalisa Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..