
Cultural Policy : चित्रशिल्प कलेबाबत नागरिकांमध्ये गत काही वर्षांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. प्राथमिक शाळेपासून चित्रकला या विषयाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे.
चित्रशिल्प कलाकारांचा नवीन सांस्कृतिक धोरणात विचार व्हावा, विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा असून, चित्रशिल्पकलेबाबत नागरिकांमध्ये साक्षरता येण्याची आशा चित्र- शिल्पकारांना आहे. (Citizens should be literate about painting and sculpture culture policy expectations nashik news)
सांस्कृतिक धोरण येत्या नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार आहे. यासाठी विविधक्षेत्रातील अडचणींचा अभ्यास करून त्यावर मात करण्यासाठी उपसमित्या कामकाज करीत आहे. चित्रशिल्प कलाकारांसाठी सांस्कृतिक धोरण दृश्यकला उपसमिती कलाकारांच्या अडचणी समजून घेत आहे.
यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये याबाबत समिती प्रमुख व कलाकारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकाही होत आहे. चित्रकला नागरिकांना वाचता यावी, समजली पाहिजे. कला म्हणून नागरिकांनी याकडे पाहावे, अशी अपेक्षा चित्रकारांमध्ये आहे. नाशिक शहरांत विविध शिल्प साकारण्यात आले आहे.
त्याची गुणवत्ता ढासळली आहे. ही गुणवत्ता पाहता येणाऱ्या देशातील पर्यटकांमध्ये नाशिकबाबत वेगळी प्रतिमा ते घेऊन जात आहे. ती बदलावी अशीही आशा चित्र-शिल्पकारांना नवीन सांस्कृतिक धोरणाकडून आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चित्रकला शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात
गत दहा वर्षांपासून निवृत्त झालेल्या कला शिक्षकांनंतर त्या रिक्त जागाच भरल्या गेलेल्या नाहीत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला हा विषयच नाही. तसेच, माध्यमिक पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना विषय शिक्षकच कलेचे ज्ञान देत आहे, तसेच, यासंबंधीचे विविध कोर्सेस मागे पडले आहेत.
नवीन कोर्सची फी मोठी असल्याने अनेकांना परवडत नाही. त्यामुळे पिढीचे नुकसान होत असल्याची खंत चित्र-शिल्पकारांनी व्यक्त केली. तसेच, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोर्स माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जावा.
"चित्रकला नागरिकांना बोलता, वाचता, समजली पाहिजे. प्राथमिक- माध्यमिक शाळांमध्ये कलाशिक्षकांची भरती गत दहा वर्षाहून अधिक काळापासून झालेली नाही. विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये चित्रकलेविषयी साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे." -मुक्ता बालिगा, ज्येष्ठ चित्रकार
"राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जहाँगीरसारखी आर्ट गॅलरी होण्याची गरज आहे. कलाशिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या गेलेल्या नाहीत. कला शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे एका पिढीचे नुकसान होत आहे. कला जोपासली जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील वेगळेपण करण्याची क्षमता निर्माण होत नाही." -राजेश सावंत, ज्येष्ठ चित्रकार
"शिल्पकारांना काम करीत असताना स्थैर्य मिळत नाही. कलाकार म्हणून काम करीत असताना व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून काम करावे लागते. शिल्प निर्माण करताना जागेची अडचण निर्माण होते. नवतरुणांना शिल्प कलेतील व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रांप्रमाणे शासनाने प्राधान्य द्यावे" - वरुण भोईर, शिल्पकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.