esakal | ''नाशिककरांनो, कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही'' - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal changan.jpg

जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी. फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यासाठी होईल. 

''नाशिककरांनो, कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही'' - छगन भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यांनी रात्रं-दिवस घेतलेल्या मेहनतीला नागरिकांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण यशस्वी होत आहोत; परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही. प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. म्हणूनच दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता

शहर आणि जिल्ह्यातील जनतेला भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्यात. ते म्हणाले, की फटाके आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली जावी. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांनी विना मास्क व्यक्तींना वस्तूंची विक्री करून नये. तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणांना सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यादृष्टीने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी. फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यासाठी होईल. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

धुराचा त्रास होण्याची शक्यता अधिक

कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करत असतो. त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना धुराचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी करावा. तसेच फटाके फोडतांना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी. सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी सरकार आणि प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top