टाकेद-धामणगाव रस्त्याची झाली चाळण! दीड ते दोन फुटांचे खड्डे

citizens suffer due to large number of potholes on taked-dhamangaon road
citizens suffer due to large number of potholes on taked-dhamangaon roadSakal


सर्वतीर्थ टाकेद (जि.नाशिक) : टाकेद- धामणगाव रस्त्याची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झालेली असून त्यात आता महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाट लागली आहे. सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे नरकयातनाच आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून दुरुस्ती करावी अन्यथा आता थेट आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांनी दिला आहे.


या रस्त्याने सतत हतूक असते. एसएमबीटी रुग्णालयात जाणारे रुग्ण, कर्मचारी तसेच शेतकरी, सर्वतीर्थ टाकेद ही परिसरातील एकमेव मुख्य मध्यवर्ती बाजारपेठ, शाळा महाविद्यालय असलेले ठिकाण असल्याने या मार्ग सतत गजबजलेला असतो. धामणगाव- टाकेद रस्त्यावर धामणगावजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठीच्या अवजड वाहनांमुळे तर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही. टाकेद कडवा नदीच्या दोन्ही पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. टाकेद- आधारवड, टाकेद खुर्द रस्त्यावर कडवा नदी पुलाजवळ जवळपास दहा फूट लांबी रुंदीचा व दोन फूट खोलीचा जीवघेणा मोठा खड्डा पडला आहे.

citizens suffer due to large number of potholes on taked-dhamangaon road
नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिला ठार

लोकप्रतिनिधी लक्ष देतील?

टाकेद फाटा- अधरवड ते टाकेद- म्हैसवळण घाट रस्ता, पिंपळगाव मोर ते वासाळीफाटा, घोटी- कोल्हार रस्ता आणि टाकेद ते धामणगाव रस्ता या तिन्ही महत्त्वाच्या रस्त्यांची वाताहत झाली आहे. आतातरी याप्रश्नांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष्य घालावे. किमान या रस्त्याचे खड्डे तरी बुजवावे अशी मागणी संग्राम पाटील, विक्रम पुंडे, शुभम बरे, दत्ता घोड, महेश भांगे, योगेश वाडेकर आदींसह धामणगाव, टाकेदसह परिसरातील प्रवासी, वाहनधारक, शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

टाकेद-धामणगाव रस्त्यावरून समृद्धी महामार्गाच्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. रस्ता दुरुस्त करून नरक यातना संपवा.
- संग्राम पाटील, एसएमबीटी कर्मचारी, टाकेद.

धामणगाव ते टाकेद रस्त्याने दररोज हजारो वाहने, प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी बांधव जीवघेणा प्रवास करत आहेत, परंतु अद्यापही बांधकाम विभाग जागा झालेला नाही. लोकप्रतिनिधीही या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे.
- विक्रम पुंडे, ग्रामस्थ धामणगाव.

citizens suffer due to large number of potholes on taked-dhamangaon road
नगरचा असलेला शेजार तापदायक! येवला, निफाड, सिन्नरची चिंता वाढली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com