Nashik News : सकळही तीर्थे निवृत्तिनाथांच्या पायी! दिंड्यांच्या आगमनाने अवघे शहर न्हाले भक्तिरसात

At Anjaneri Mr. Yogiraj Tukarambaba's palanquin was paraded, at which time the warkaris who participated chanted Harinama.
At Anjaneri Mr. Yogiraj Tukarambaba's palanquin was paraded, at which time the warkaris who participated chanted Harinama.esakal

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पौषवारी अर्थात निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव बुधवार (ता. १८)पासून सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरातील दिंड्या भक्तिभावात व नामस्मरण करत त्र्यंबक नगरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. यातील अनेक दिंड्यांचा मुक्काम शनिवारी (ता. १४) नाशिकनगरीत राहिला. त्यामुळे शहराच्या चौकाचौकांत भक्तिरसाचे दर्शन घडले. (city bathed in devotion only with arrival of Dindis to sant Nivrittinath trimbakeshwar Nashik News)

फुगडी खेळताना भाविक महिला.
फुगडी खेळताना भाविक महिला.esakal

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पौषवारीचे औचित्य साधून पौष वारीच्या पूर्वसंध्येपासून तर शनिवार (ता. २१)पर्यंत निवृत्तिनाथ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड, पिंपळगाव बसवंत, निफाड, दिंडोरी, इगतपुरीसह आदिवासी पाड्यातील जव्हार, मोखाडा, भिवंडी, कल्याण या भागातून मोठ्या संख्येने वारकरी ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करत निवृत्तिनाथांच्या त्र्यंबकेश्वर नगरीकडे प्रस्थान करत आहे. साधारणपणे दहा ते पंधरा दिवस अगोदर दूरच्या दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवतात.

‘सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी’

वारकऱ्यांना निवृत्तिनाथ गुरुस्थानी आहेत. ज्ञानदेवांनी आपल्या अभंगात निवृत्तिनाथांबद्दल आदराने आणि गौरवपूर्ण वर्णन केले आहे. तीर्थाचे तीर्थ म्हणजे निवृत्तिनाथ आणि वारकरी वर्गाचे समर्थ असे भक्तिपीठ आणि आद्यपीठ म्हणजे निवृत्तीराय आहेत.

At Anjaneri Mr. Yogiraj Tukarambaba's palanquin was paraded, at which time the warkaris who participated chanted Harinama.
TATA Mumbai Marathon : टाटा मॅरेथॉनमध्ये नाशिकने पाडली छाप!
हरिनामाचा गजर करत संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या वारकऱ्यांचे हे दृश्‍य.
हरिनामाचा गजर करत संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या वारकऱ्यांचे हे दृश्‍य.esakal

ज्ञानदेवांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचे सारे श्रेय वडील भाऊ आणि गुरू म्हणून निवृत्तिनाथांना दिले आहे. ते म्हणतात,

सद्‍गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी

समर्थांची कांता काय भीक मागे, मनाचिया जोगे सिद्धी पावे

निवृत्तिनाथांच्या दर्शनाच्या ओढीने जिल्हाभरातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हरिनामाचा गजर करत या पालख्या मंगळवारी (ता. १७) त्र्यंबकेश्वरला विसावतील नाथांच्याचरणी नतमस्तक होतील.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

At Anjaneri Mr. Yogiraj Tukarambaba's palanquin was paraded, at which time the warkaris who participated chanted Harinama.
Nashik Teachers Constituency Election : माघार घेण्यासाठी महसूल कार्यालयात वाढली गर्दी!
 भगवा ध्वज घेऊन, हरिनामाचा गजर करत संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या वारकऱ्यांचे हे दृश्‍य.
भगवा ध्वज घेऊन, हरिनामाचा गजर करत संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या वारकऱ्यांचे हे दृश्‍य.esakal

महिरावणीत रंगले गोल रिंगण

संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथील वैकुंठवासी योगीराज तुकारामबाबा पालखी सोहळा महिरावणी येथे थांबला असता, याठिकाणी पालखीचा रिंगण सोहळा पार पडला. याठिकाणी वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. नीलिमाताई पवार यांच्या कुटुंबीयांनी याठिकाणी दिंडीचे स्वागत केले.

"भागवत संप्रदाय हा आध्यात्मिक लोकशाही असलेला संप्रदाय आहे. निवृत्तिनाथांनी मध्ययुगीन काळात ही लोकशाही आणि समर्थ अशी भक्तीचळवळ पंढरपुरी वाळवंटात खुली केली. विठ्ठलाच्या चरणी श्रद्धाभाव असलेला अतिसामान्य वारकरी हा वारकरी पंथाचा मूळ घटक आणि तोच गाभा आहे." - प्रा. अमर ठोंबरे, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख, संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर

At Anjaneri Mr. Yogiraj Tukarambaba's palanquin was paraded, at which time the warkaris who participated chanted Harinama.
Makar Sankranti Drive : वाहतूक शाखेतर्फे दुचाकींना ‘ॲन्टी मांजा तार!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com