Nashik News : सिटी सेंटर मॉल सिग्नल ठरतोय Acidental hotspot

City Centre Mall Signal
City Centre Mall Signalesakal

नाशिक : उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल सिग्नल दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी अन्‌ सततच्या अपघातांमुळे ‘ॲक्सिडेंटल हॉटस्पॉट’ ठरू पाहतो आहे. शहरातून सिडकोकडे आणि इंदिरानगर-गंगापूर रोड परिसराला जोडणारा रस्ता असल्याने याठिकाणी सकाळ-सायंकाळ मोठ्याप्रमाणात वाहनांची रहदारी होऊन कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे.

वाहतूक पोलिस कोंडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात मात्र वसुलीवर तीक्ष्ण डोळा ठेवतात. लवाटेनगरच्या रस्त्यावर दुतर्फा अनधिकृत पार्किंगमुळे स्थानिक रहिवासीही वैतागले आहेत. तर, मॉलची पार्किंग सशुल्क असल्याने वाहने रस्त्यावरच पार्क करणे वाहनचालक पसंत करतात. वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई होत नसल्याने अखेर याठिकाणी शनिवारी (ता. २६) दुचाकीस्वार वृद्धाचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेनंतरही रविवारी (ता. २७) कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.(City center mall Signal is becoming accidental hotspot Nashik News)

City Centre Mall Signal
Nashik Crime News : कर्डिल खून प्रकरणात पोलिसांना मिळेना धागेदोरे

नाशिक शहर, सिडको, इंदिरानगर-नाशिकरोड, सातपूर-गंगापूर रोड या परिसराला जोडणारा सिटी सेंटर मॉलचा सिग्नल महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सिग्नलवर सकाळ-सायंकाळ वाहनांच्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनली आहे. विशेषत: विकेंडला सिटी सेंटर मॉलमध्ये होणाऱ्या गर्दीचाही अतिरिक्त ताण या सिग्नलवर येतो.

अनेकदा वाहतूक कोंडीमुळे या सिग्नलच्या चोहीकडे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत या सिग्नलवर वाहतूक कोंडी असते. त्यातही सिग्नलकडून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर याच वेळेत मोठ्याप्रमाणात अनधिकृतरीत्या चारचाकी-दुचाकींची पार्किंग केली जाते.

त्यामुळे सदरील रस्ता वाहनांच्या मार्गक्रमणासाठी आणखीच अरुंद होऊन अपघाताच्या घटना घडतात. त्यातच याच मार्गावर अनेक बहुमजली इमारतीचे बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी अवजड वाहनांची वर्दळही याच मार्गावरून असते. त्यातूनच शनिवारी (ता. २७) ७६ वर्षीय दिलीप हनुमंत भावे यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

City Centre Mall Signal
Nashik Crime News : आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणाची नाशिक भाजप महिला आघाडीकडून दखल

मॉलला अनधिकृत पार्किंगचा विळखा

सिटी सेंटर मॉलमध्ये दुचाकी-चारचाकी पार्किंगची सशुल्क व्यवस्था आहे. परंतु, याठिकाणी येणारे बहुतांशी नागरिक हे शुल्क असल्याने मॉलच्या पार्किंगचा वापर न करता मॉलसमोर रस्त्यालगतच आपली चारचाकी-दुचाकी वाहने अनधिकृतरीत्या पार्किंग करतात. बहुतांशी दुचाकीचालक दुभाजकांच्या आतमध्ये आपल्या दुचाक्या पार्क करतात. यामुळे सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावरील वाहने चालविताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मॉलच्या पाठीमागेही दुचाक्या पार्क केल्या जातात.

वाहतूक पोलिसांची उदासीनता

सिग्नलवर एक-दोन नव्हे तर युनिटच्या पोलिस निरीक्षकासह चार-पाच वाहतूक पोलिस सायंकाळच्या सुमारास असतात. परंतु, हे सारे सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दंडात्मक वसुलीसाठी सावज हेरण्यासाठीच थांबलेले असतात. या पोलिसांकडून अनधिकृतरीत्या पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना टोईंग वा दंडात्मक कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्यांचे फावते. परंतु, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असतानाही वाहतूक पोलिसांची त्याबाबतची उदासीनता नेहमीची कळीचा मुद्दा राहिली आहे.

City Centre Mall Signal
Nashik News : पोलिस भरतीचे Server Down; दोन दिवसांवर अंतिम मुदतीमुळे उमेदवारांना मनस्ताप

अवजड वाहनांना प्रवेश कसा?

शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर दिवसा सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शहर पोलिस आयुक्तालयाची अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांशी रस्त्यावर भरदिवसा वाळू, सिमेंट, स्टील आदी बांधकाम साहित्याच्या अवजड वाहनांसह औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने धावताना दिसतात. गेल्याच आठवड्यात मुंबई नाका येथे सिमेंट मिक्सर डंपरने धडक दिल्याने तीनचार वाहनांचे नुकसान झाले. तर शनिवारी मॉलसमोर वाळूच्या डंपरने वृद्धाला चिरडल्याची घटना घडली. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही ही वाहने येतातच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

रस्त्यालगत फळविक्रेते

याच रस्त्यावर सिग्नलनजीकच फळविक्रेत्यांची अनधिकृतरीत्या दुकाने थाटली आहे. या दुकानावर वाहनचालक थांबत असल्याने त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. परंतु, या विक्रेत्यांना ना महापालिका कारवाई करीत वा पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचा ताण सिग्नलवर पडतो.

"वाहतुकीच्या दृष्टिकोनातून याठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील. जेणेकरून अपघात टाळता येतील. अनधिकृत पार्किंग संदर्भातही नियोजन करण्यात येईल."

- सिद्धेश्‍वर धुमाळ, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा.

* वाहतूक कोंडी अन्‌ अनधिकृत पार्किंगने घेतला वृद्धाचा बळी

* वाहतूक पोलिसांचा डोळा वसुलीवर; कोंडीकडे दुर्लक्ष

* सिग्नलवर नित्याच्या अपघाताच्या घटना

* जीव मुठीत धरून चालकांचा प्रवा

City Centre Mall Signal
Nashik News : निफाडच्या संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात तरुणांची काकसेवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com