
ब्लॅक स्पॉट बाबत शहरात सर्व्हेक्षण; शहर घाण करणाऱ्यांना बसणार चाप
नाशिक : शहरात दुचाकीवरून जाता- येताना रस्त्यात कुठेही कचऱ्याच्या पिशव्या फेकून शहर घाण (Trash) करणाऱ्यांना चाप लावण्याचे महापालिका (NMC) प्रशासनाने ठरविले आहे. कचरा पिशव्या फेकण्यासह सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे घाण होणाऱ्या अशा ब्लॅक स्पॉटचे (Black Spot) तातडीने सर्व्हेक्षण करून महापालिकेने साधारण ५७ ब्लॅक स्पॉट निर्मूलनाची तयारी सुरू केली आहे. (City Survey on Black Spots Nashik News)
खातरजमा करणाऱ्यांसाठी पथक
महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन तशा सूचना दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सूचनेनुसार शहरातील सगळ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या याद्या व त्यांना नेमून दिलेल्या ड्यूटीच्या जागांबाबत यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी माहिती मागविली आहे. अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्तांनी उपायुक्तांवर जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ड्यूटीच्या जागांसह रस्त्यावर चालता, चालता कचरा फेकून पुढे जाणाऱ्यांवर अशा पथकाकडून भविष्यात कारवाई शक्य होणार आहे. अतिरिक्त आयुक्तांसह घनकचरा संचालक आणि सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांवर स्वच्छता निरीक्षकांसोबत अचानक भेटी देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवून खातरजमा करणाऱ्यांसाठी पथक कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे ब्लॅक स्पॉट नष्ट करण्याच्या उपाययोजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आशा आहे.
सगळ्याच जागांवर मनपा कर्मचारी
शहरात पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पूर्व, पश्चिम विभागात ब्लॅक स्पॉटचे प्रमाण अधिक आहे. साधारण ५७ ब्लॅक स्पॉट महापालिका यंत्रणेने निश्चित केले असून, त्यावर बारीक लक्ष ठेवून कारवायांच्या सूचना आहेत. शहरातील सहापैकी सर्वाधिक ब्लॅक स्पॉट असलेल्या या चारही विभागात नव्याने ब्लॅक स्पॉटचे सर्व्हेक्षण करून ते सगळे स्पॉट नष्ट करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत. विशेष दसक ते टाकळी मार्ग, तपोवन रस्ता, जय भवानी रोड, रामकुंड लगत गोदावरी परिसर, जुने नाशिक, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचा परिसर, वडाळा नाका अशा ब्लॅक स्पॉटवर कायम सर्वाधिक कचरा असतो. मात्र, आता शहरातील सगळ्याच जागांवर महापालिकेचे कर्मचारी नेमून कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता व वाहनांचे क्रमांक घेऊन त्यानुसार त्या भागात घंटागाडीचे नियोजन करून सगळे स्पॉट नष्ट करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख व जास्त रहदारीच्या मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: टंचाईग्रस्त भागात 401 टँकरने पाणीपुरवठा; टंचाईत यंदा 244 वाड्यांची भर
अशी राबविणार मोहीम
- ब्लॅक स्पॉटवर कचरा करणाऱ्यांवर बारीक नजर
- विभागीय अधिकाऱ्यांच्या आठवड्यातून दोनदा भेटी
- विना परवानगी गैरहजर कंत्राटी कामगारावर लक्ष
- आधी खुलासा घेणार त्यानंतर दंडात्मक कारवाया
- खातेप्रमुख आयुक्तांना नियमित आढावा देणार
- दंडाची रक्कम वेतनातून कपात करण्याच्या निर्णय
हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात
Web Title: City Survey On Black Spots Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..