Citylinc Bus Service : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बससेवेचे नव्याने नियोजन; जाणुन घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc news

Citylinc Bus Service : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बससेवेचे नव्याने नियोजन; जाणुन घ्या

नाशिक : सिटीलिंकच्या बसमुळे शहरात वाहतूक ठप्प होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिटीलिंक कंपनीकडून निमाणी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६२ फेऱ्या जुना आडगाव नाका येथून, तर ३४ बस फेऱ्या तपोवन डेपोतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Citylinc Bus Service New planning of bus service to avoid traffic congestion Nashik news)

निमाणी बस स्टॅन्ड परिसरात दिंडोरी नाका तसेच पंचवटी कारंजा हा अतिशय वर्दळीचा भाग असल्याने येथे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार कायम घडतात. निमानी बस स्थानकामधून बस सुटल्यानंतर या भागातील चौकात रस्ता क्रॉस करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने आता सिटीलिंक कंपनीने निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे सिटीलिंकने घेतलेल्या या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणीदेखील करण्यात आली आहे. निमाणी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यात सिटीलिंक प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Garbage in city : शहरातील कचऱ्यात 10 टक्के वाढ!; रात्रीची 20 ठिकाणी घंटागाडी सुरू

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने ६२ बस फेऱ्‍यांना पंचवटी डेपो कॉर्नर ( जुना आडगाव नाका) येथे टर्न दिला आहे, तर ३४ बस फेऱ्या तपोवन डेपो येथे हलविण्यात आल्याने या बसचे किलोमीटर वाढून त्याचा आर्थिक फटका सिटीलिंक ला सहन करावा लागतो. मात्र याचा कोणताही बोजा सिटीलिंक आपल्या प्रवाशांवर लादणार नाही. प्रवासी व नाशिककरांच्या सोयीसाठी सिटीलिंक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्याचा कोणताही भार प्रवासी भाड्यावर सिटीलिंकने लादलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

या मार्गावर फेरनियोजन

मार्ग क्रमांक १०१ ए, १०२ बी, १०६ ए, १०९ ए, १११ बी, १२८ ए, १२९ ए, १३० ए असे हे ८ मार्ग असतील. त्याचप्रमाणे १०१ ए, १०२ बी, १२९ ए, १३० ए या चार मार्गावरील ३४ बस फेऱ्यादेखील तपोवनात हलविण्यात आलेल्या आहेत. सदर बसदेखील निमाणी येथे न येता दुसऱ्या मार्गाने तपोवनात जातील व तेथूनच मार्गस्थ होतील.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : उपरोधिक मर्मभेदक विनोद ‘शीतयुद्ध सदानंद’