Nashik | सिटीलिंकतर्फे आणखी तीन मार्गांसाठी बससेवा

Citylink bus service for three more routes in nashik news
Citylink bus service for three more routes in nashik newsesakal

नाशिक : महापालिका परिवहन महामंडळ (Municipal Transport Corporation) सिटीलिंकतर्फे (Citylinc) नाशिक रोड स्थानकातून आणखी तीन मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक ते चुंचाळे गाव (मार्ग २२८), नाशिक रोड रेल्वे स्थानक ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) (मार्ग २३८), तसेच गंगावऱ्हे (मार्ग २३९), अशा तीन मार्गावर सोमवार (ता.२५) पासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

Citylink bus service for three more routes in nashik news
शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नाशिक महानगर परिवहन सेवेच्या सध्या ४७ मार्गावर २०२ बस धावतात. मात्र, बससेवेला वाढता प्रतिसाद पाहून सातत्याने नवनव्या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी होत आहे. सोमवारपासून नाशिक रोड रेल्वेस्थानक ते चुंचाळे गाव (मार्ग २२८) या दरम्यान पहाटे सहा वाजून १० मिनीटांनी पहिली बस सुरू होईल. तर, या मार्गावर अखेरची बस सायंकाळी साडे सहाला सुटेल. दुसऱ्या मार्ग २३८ वरून नाशिक रोड ते यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या दरम्यान द्वारका, सीबीएस, आनंदवली, गंगापूर रोड या मार्गावर पहिली बस सकाळी ८ वाजून ४० मिनीटांनी सुटेल, तर अखेरची बस दुपारी साडेचारला सुटेल. मुक्त विद्यापीठातून सायंकाळी सहाला बस उपलब्ध होईल. तिसऱ्या २३९ मार्गावर नाशिक रोड गंगावऱ्हे दरम्यान बस द्वारका, सीबीएस, आनंदवली, गंगापूर रोड या दरम्यान पहिली बस सकाळी ७ वाजून १० मिनीटांनी सुटेल. तर शेवटची बस रात्री दहाला सुटेल, तर पंचवटी कनेक्शनसाठी गंगावऱ्हे ते नाशिक रोड दरम्यान पावणेसहाला तर नाशिक रोडहून रात्री दहाला फेऱ्या होणार आहेत.

Citylink bus service for three more routes in nashik news
पाकिस्‍तानातील शिक्षणास मनाई; SICTE, UGC ची विद्यार्थ्यांसाठी सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com