जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ

नाशिक : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा करत असलेले काम हे नक्कीच कौतुकास्पद असून यापुढे देखील जिल्ह्याच्या विकासासाठी शासन आणि प्रशासन हे कटिबद्ध राहिल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या (Maharashtra Din) ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे (Seema Hirey), विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) उपस्थित होते. (Committed to overall development of Nashik district Chhagan Bhujbal Nashik News)

हेही वाचा: भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

श्री.छगन भुजबळ म्हणाले, की राज्याच्या स्थापनेपासून देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्र राज्याने नेहमीच सक्रीय सहभाग नोंदवला आहे. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिन कोरोना प्रतिबधांच्या सावटाखाली व मर्यादित स्वरूपात साजरा केला होता. परंतु आज ही परिस्थिती बदलून महाराष्ट्र दिनाचा हा दिवस निर्बंध मुक्त वातावरणात साजरा करण्याचे संपूर्ण श्रेय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे आहे.

हेही वाचा: १३ जूनपासून पुन्‍हा वाजणार शाळेची घंटा

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चालू आर्थिक वर्षात (Financial Year) जिल्हा वार्षिक योजनेत १ हजार १३ कोटी रूपयांचा निधी मिळणार असून याअंतर्गत सर्वसाधारण योजनांसाठी ६०० कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ३०८ कोटी व अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १०० कोटींचा समावेश आहे. देवसाने माजंरपाडा वळण योजना ही पार खोऱ्यातील विनावापर अरबी समुद्राला (Arabian Sea) जाऊन मिळणारे पाणी अडवून पूर्वेकडे वळविण्याची महाराष्ट्र शासनाची पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने ३ हजार ४५० मीटर लांबीचे मातीचे धरण बांधून ८ हजार ९६० मीटरच्या मुख्य वळण बोगद्याद्वारे तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविले.

शेतकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधांसोबतच त्यांना महावितरणच्या (MSEDCL) माध्यमातून विद्युत पुरवठ्याचेही काम प्राधान्याने केले जाते. त्यात कृषिपंप विज धोरणांतर्गत ७६० कोटींची विजबिलामध्ये सूट देण्यात आली आहे. यात १ लाख ८३ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आपली उर्वरीत थकबाकी भरून सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ७ हजार ३१० शेतकऱ्यांना शेतीपंपाकरिता वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध लोकसेवा देण्याकरिता आजपासून राज्यात तसेच जिल्ह्यात सेवाहमी कायद्यांतर्गत ३५ सेवा विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या ७० सेवा अशा १०५ सेवा अधिसूचित करून त्या लागू करण्यात येत आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) स्मार्ट शाळा अभियान या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत नविन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षकांचा कौशल्य विकास, शालेय पायाभूत सुविधांचा पूनर्विकास, शाळांमध्ये इनोव्हेशन लॅब, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुषंगाने सहकार्य, आयटीने शाळेचा परिसर सक्षम करणे, स्मार्ट स्कुल कॅम्पस, डिजिटल ग्रंथालय व ई-स्कूल आदी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस महासंचालक पदकप्राप्त व प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा पदक देवून गौरव करण्यात आला. यावेळी शहर व ग्रामीण पोलीस दल, गृहरक्षक, अग्नीशमन विभागाच्या जवांनानी शानदार संचलन केले.

यांचा झाला गौरव
वसंत आर. धुमसे (आदर्श तलाठी), नारायण न्याहाळदे (अप्पर पोलीस अधीक्षक), पंकज पळशीकर (पोलीस हवालदार), एकनाथ बाविस्कर (पोलीस हवालदार), प्रकाश महाजन (पोलीस नाईक), डॉ.अंचल मुदगल (पोलीस निरीक्षक), श्रीकांत निंबाळकर (पोलीस निरीक्षक), संतोष जाधव (सहायक पोलीस उपनिरीक्षक), बाळु लभडे (पोलीस हवालदार), नितीन संधान (पोलीस हवालदार), रविंद्रकुमार पानरसे (पोलीस हवालदार), सुनिल कुलकर्णी (पोलीस हवालदार), राहुल जगझाप (पोलीस नाईक), यतीनकुमार पवार (पोलीस नाईक), इम्रानोद्दीन मुल्ला (पोलीस नाईक), दशरथ पागी (पोलीस नाईक), अश्विनी देवरे (पोलीस नाईक), भालचंद्र खैरनार (पोलीस नाईक), प्रविण वाघमारे (पोलीस नाईक)

Web Title: Committed To Overall Development Of Nashik District Chhagan Bhujbal Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top