
नाशिक पोलिसांनी सावकारी प्रकरणी अटक केलेल्या रोहित कैलास कुंदलवाल याच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. रोहितवर सावकारीसह खंडणी, महिलांचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी असे पाच गुन्हे दाखल आहेत. तो भाजपचा पदाधिकारी असून २०२२ ला राज्यात झालेल्या सत्तानाट्यात ६०० कोटी (खोकी) माझ्याकडेच होते. पैशांच्या कंटेनरमध्ये आठ दिवस-रात्र मी फिरत होतो असं तो लोकांना सांगायचा. लोकांना असं सांगूनच त्याने वसुली केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.