esakal | स्वच्छ सर्वेक्षणात नगरपालिका गटात 'ही' शहरे स्वच्छ; तुमच्या शहराचा नंबर कितवा?
sakal

बोलून बातमी शोधा

clean survey.jpg

स्वच्छ सर्वेक्षण 2020 हे केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून घेतलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे पाचवे वर्ष असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ शहरांची यादी आज जाहीर झाली आहे. त्यात, महापालिका गटात नाशिक देशात ११ व्या तर राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. ​

स्वच्छ सर्वेक्षणात नगरपालिका गटात 'ही' शहरे स्वच्छ; तुमच्या शहराचा नंबर कितवा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - स्वच्छ सर्वेक्षण 2020 हे केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून घेतलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे पाचवे वर्ष असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ शहरांची यादी आज जाहीर झाली आहे. त्यात, महापालिका गटात नाशिक देशात ११ व्या तर राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. तर नगरपालिका गटात भगूर, सिन्नर नांदगाव त्र्यंबकेश्‍वर शहरांनी वरचा क्रमांक राखला आहे. वर्षानुवर्ष अस्वच्छ म्हणून गनना होणाऱ्या शहरानी  मोठा पल्ला गाठला आहे.  गेल्या सहा महिन्यापासून राबविलेल्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाल्याचे नगरपालिका कारभाऱ्यांचे म्हणणे आहे. 

भगूर राज्यात सोळाव्या स्थानी 
संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानापासून अनेक वर्षापासून सातत्याने स्वच्छतेच्या पुरस्कारात अग्रेसर असलेल्या भगूर नगरपालिकेने स्वच्छतेत वरचा क्रमांक राखण्यात यश मिळविले आहे. सलग पाच वर्षापासूनची 
जनजागृती स्पर्धेच्या काळात एकजुटीचे प्रयत्न यामुळे स्वच्छता पुरस्कारात भगूर चर्चेत राहिले आहे. आज स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात भगूर शहराची  देशाच्या पश्चिम विभागात २२ तर राज्यात  १६ व्या स्थानी  आहे. भगूर शहराच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. मागील स्वच्छ सर्वेक्षण 2019  च्या तुलनेने भगूर शहराने खूप प्रगती केलेली आहे  या सर्वांमध्ये नागरिकांचा सहभाग व प्रशासनाने केलेली मेहनत याचीही फलश्रुती आहे तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देखील आपले सहकार्य सहभाग कायम ठेवतील असा विश्‍वास नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी सांगितले. 

सिन्नर नगरपरिषद उत्तर महाराष्ट्रात 20व्या स्थानी
 केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत सिन्नर नगरपरिषदेचा भारताच्या पश्चिम विभागात 20 वा क्रमांक लागला तर राज्यात 18 वा आणि नाशिक झोन मध्ये 17 वा क्रमांक लागला असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे,उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले,गटनेते हेमंत वाजे,मुख्याधिकारी संजय केदार व आरोग्याधिकारी रवी देशमुख यांनी दिली.केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या स्वच्छ भारत अभियानात नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी केली होती. केंद्रस्तरावर पारितोषिक मिळाले होते.हागणदारी मुक्त शहराची संकल्पना नियोजनबद्धरीत्या राबवून संपूर्ण शहर हागणदारी मुक्त करण्यात पालिकेचे आरोग्य विभाग यशस्वी झाले होते.त्यानंतर कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू करण्यात आला.शौचालयाच्या मैला व्यवस्थापनाचा भारतातील पहिला प्रकल्प सिन्नर नगरपरिषदेने यशस्वीपणे सुरू केला.त्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी  देशभरातून अभ्यास करण्यात आला.ओडीएफ प्लस साकारणा-या सिन्नर नगरपालिकेला केंद्र शासनाकडुन दीड कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.आता स्वच्छता सर्व्हेक्षणमध्येही भारतात 20 वा क्रमांक आल्याने सिन्नरच्या शिरपेचात नव्याने मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नांदगाव शहर राज्यात ४३ व्या स्थानी   
नांदगाव शहरास स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये संपूर्ण भारतातील पश्चिम झोन मधून ६१ वा व महाराष्ट्र राज्यात ४३  वा क्रमांक मिळाला तर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे  मानकरी ठरली.नांदगाव चे नगराध्यक्ष राजेश कवडे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्वच्छता बाबत केंद्र सरकारच्या स्वच्छता विषयक निकषांचे काटेकोर पालन कृरण्यात आले.असे पश्चिम विभाग श्रेणीमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये नांदगाव  पालीकेने यंदा चांगली कामगिरी नोंदविली  आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम यामुळे ही नोंद झाली असे नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी सांगितले. 

त्र्यंबकेश्‍वर विभागात २२ व्या स्थानी
स्वच्छ सर्वेक्षण 2020 हे केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून घेतलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे पाचवे वर्ष असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ शहरांची यादी आज जाहीर झाली त्यात, देशभर धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेने स्वच्छतेच्या अंगाने केलेल्या प्रयत्नाच्या तुलनेत निकाल आधिक चांगला आहे.राज्यात ४४ तर विभागात२२ व्या स्थानी आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न त्यांचे आंदोलन मध्यंतरीच्या काळात प्रश्‍न निर्माण होउनही त्यात मात करीत, रात्रीची शहर स्वच्छतेची कल्पना यशस्वी ठरली. नियमितपणे  घंटागाडी फिरविणे, शहरातील नागरिकांचा आणि भाविकांचा कचरा होउ न देणे रात्रीची घंटागाडी फिरविणे  भाविकांची मार्ग स्वच्छता राखणे या सातत्याने केलेल्या प्रयत्नांना नागरीक व भाविकांनी साथ दिल्याने हे यश मिळाल्याचे  नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सांगितले. 
त्र्यंबकेश्‍वर हे धार्मिक पर्यटन स्थळ असून शहराच्या लोकसंख्येच्या  बरोबरीने बाहेरील फ्लॉटींग पॉप्युलेशन येत असते. त्यामुळे स्वच्छता हा प्राधान्याचा विषय राहिला 

इगतपुरी राज्यात ५६ व्या स्थानी
नाशिक मुंबई मार्गावरील महत्वाचे शहर असलेल्या इगतपुरीत  पश्‍चिम भारत यादीत७९ व्या स्थानी तर राज्यात  ५६ व्या स्थानी आहे. इगतपुरी नगर परिषदेने आरोग्य सुविधांबाबत केलेल्या प्रयत्नांना यश आले. शहराच्या  हद्दीतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहरात स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. यंदा स्वच्छतेबाबत नगर परिषदेला चांगले गुण मिळाले आहे. यात प्रयत्नात सातत्य ठेवले जाईल. असे नगराध्यक्ष   - संजय इंदूलकर यांनी सांगितले.  पावसाळ्या पूर्वीच नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व गटारी-नाले यांची नियमीत साफसफाई केल्याने गेल्या विस दिवसांपासुन पावसाची संततधार सुरु असुनही कोठेही पाणी तुंबले नाही. असे मुख्याधिकारी  निर्मला गायकवाड- पेखळे यांनी सांगितले. 
  

सटाणा राज्यात ५० व्या स्थानी
 सटाणा : सटाणा केंद्र शासनाने नगरपालिका' नगरपंचायत स्वच्छता अभियान सर्वेक्षण जाहीर केले असून  त्यात सटाणा शहराचा राज्यात 50 वा  क्रमांक आला असून देशात 68वा क्रमांक आला आहे.  केंद्र सरकारच्या  स्वच्छता सर्वेक्षण अभियानात पात्र ठरण्यासाठी सटाणा पालिका प्रशासनाचे प्रयत्न होते या अभियानात प्राधान्यक्रमाने येण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्तींची पूर्तता करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सटाणा नगरपालिकेने मुसंडी मारली असून गेल्यावर्षी देशात पालिकेने 368 क्रमांक मिळवला होता यावर्षी 68 क्रमांक मिळविला आहे. या सर्वेक्षणात  क्रमांक प्राप्त करण्यासाठी आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याला सटाणा शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला त्यामुळेच नगरपालिकेला क्रमांक उंचविण्यात यश आल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. उपनगराध्यक्षा सुनिता मोरकर, गटनेते राकेश खैरनार, नितीन सोनवणे, महेश देवरे, राहुल पाटील,दीपक पाकळे, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे आदीच्या प्रयत्नामुळे सहा महिण्यात स्वच्छतेची स्थिती सुधारली पुढच्या वेळी आधिक  तयारीने स्पर्धेत सहभागी हणार असल्याचे श्री मोरे यांनी सांगितले.

 हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?
360 क्रमांकावरून थेट 80 व्या क्रमांकावर उडी 
येवला : पालिकेने वर्षभरातील कामाच्या जोरावर ३६० क्रमांकावरून ८० व्या क्रमांकावर तर राज्यात ५७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात (ब वर्ग) येथील पालिका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची स्वच्छ पालिका ठरली आहे. पालिकेने वर्षभर राबवलेल्या स्वच्छतेच्या कामांमुळे  हे यश मिळाल्याचा विश्वास मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी व्यक्त केला. हे अभियान २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होते. वेस्ट झोन विभागात ८० वा क्रमांक असून राज्यातील १०७ शहरा शहरांपैकी येवल्याचा क्रमांक ५७ वा आहे.विशेष म्हणजे २०१८ मध्ये २७३  तर २०१९  मध्ये ३६० पर्यत घसरला होता.मागील वर्षभरात पालिकेने सार्वजनिक शौचालयांसह वैयक्‍तीक शौचालयांवर विशेष लक्ष केंद्रित करून संख्या वाढविली. ठिकठिकाणी असलेला कचरा ही उचलून परिसर स्वच्छ केला. नागरिकांना स्वचतेची सवय लावली, या सर्वांची दखल यात घेण्यात आल्यामुळेच पालिकेने मोठी झेप घेतल्याचे मुख्याधिकारी संगीता नांदुरकर म्हणाल्या येथील 1 हजार 424 नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता.त्यांनी दिलेल्या उत्तरातून गुणानुक्रम निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच
नगरपालिका     राज्य    विभाग   जिल्हा    

भगूर                १६      १२
सिन्नर               १८     १७
नांदगाव            ४३      २१ 
त्र्यंबकेश्‍वर        ४४      २२    
दिंडोरी             ४५      २३  
सटाणा             ५०      २८
इगतपुरी           ५६      ३४
येवला              ५७      ३५  
निफाड            ६१       ३०
चांदवड           ८२      ४८
कळवण          १४०     ५३
मनमाड           ४४       ४९   (५० हजार ते १ लाख लोकसंख्या)


संपादन - विनोद बेदरकर

loading image
go to top