Nashik Crime News : जलसंपदा विभागाच्या लिपिकाचा गळा आवळून खून

Sanjay Waykande
Sanjay Waykandeesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटीतील मेरी म्हसरूळ वसाहतीत राहणाऱ्या जलसंपदा विभागाचे कनिष्ठ लिपिकाचा गळा आवळून खून करण्यात आला. सदर प्रकार शवविच्छेदन अहवालानंतर उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Clerk of Water Resources Department kill Nashik Latest Crime News)

Sanjay Waykande
Nashik : रामसेतूचा तिढा कधी सुटणार?; नूतनीकरणाचे काम रखडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरी वसाहतीमध्ये राहणारे संजय वायकांडे (वय ३८) हे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी (ता. १) सायंकाळी त्यांची पत्नी गावावरून परत आली असता घराचा दरवाजा उघडा होता, तर घरामध्ये संजय हे बेशुद्ध अवस्थेत होते. पत्नीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

त्यानंतर वायकांडे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असता, त्यामध्ये त्यांचा गळा होऊन खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल शवविच्छेदन विभागाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. सदर माहिती कळताच पंचवटी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वायकांडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Sanjay Waykande
Nashik : देवळालीत दारणाकाठी बिबट्या जेरबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com