Latest Marathi News | देवळालीत दारणाकाठी बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imprisoned Leopard at Cantonment Board Pumping Station.

Nashik : देवळालीत दारणाकाठी बिबट्या जेरबंद

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : दारणा काठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंग हाऊस जवळ बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी मागणी केली होती. त्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला असता, सोमवारी (ता. ३१) रात्री नऊच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. असे असले तरी पंपिंग परिसरात अजूनही बिबटे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (Leopard jailed near Darana river in Deolali Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : घर सोडून गेलेल्यांची पोलिसांमुळे ‘घरवापसी’

देवळाली कॅम्प, संसरी, भगूर, राहुरी, दोनवाडे परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असून बिबट्यांना त्यामुळे वास्तव्यास मोकळे रान मिळते. सध्या ऊसतोडणी सुरू झाल्यामुळे बिबटे बाहेर पडू लागले आहेत. दारणा काठच्या देवळाली कँन्टोन्मेंट बोर्डाची पिण्याच्या पाण्याची पंपिंग, विहीर नदीकिनारी असल्याने या ठिकाणी पंपिंग स्टेशनला कायमस्वरूपी व कंत्राटी कामगार असतात. दिवसा, रात्री पंप सुरू करण्यासाठी जाणारे कर्मचारी बिबट्याच्या दहशती खाली होते.

शेतकऱ्यांनी व पंपिंग कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. सोमवारी सायंकाळी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याचे स्थानिकांनी वनविभागाला सांगितले. यानंतर वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे, विवेक अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी सचिन आहेर, शारद अस्वले, विशाल शेळके, निखिल यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.

कँन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा पंपिंग स्टेशनचे कर्मचारी रोहित जाधव, निखिल भालेराव, राहुल साबळे, धीरज शिंदे, श्याम कर्पे, संदीप गोरे, ओंकार मोजाड, मयूर गोरे, विजय दुर्गुड, अक्षय यंदे यांनी सहकार्य केले. मात्र, या भागात अजूनही बिबटे असून या भागात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी केली आहे.

हेही वाचा: Nashik : ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त

टॅग्स :NashikLeoparddarna dam