Latest Marathi News | CMची घोषणा कागदावरच; नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून माघारी परतण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration Shop

CMची घोषणा कागदावरच; नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून माघारी परतण्याची वेळ

जुने नाशिक : सामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ अशा चार वस्तू केवळ शंभर रुपयात देण्याची घोषणा केली होती. दिवाळी अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीदेखील अद्याप स्वस्त धान्य दुकानात या चार वस्तूंचे पॅकेट उपलब्ध झाले नाही. नागरिकांना दुकानात जाऊन माघारी फिरण्याची वेळ येत आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच होती का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. (CM eknath shinde announcement of free Diwali festival ration remaining on paper Nashik Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वस्त धान्य दुकानातून एक लिटर पाम तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ अशा चार वस्तू केवळ शंभर रुपयात देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेने सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दिवाळी अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली असूनही मात्र स्वस्त धान्य दुकानात अद्याप चारही वस्तूंचे पॅकेट उपलब्ध झालेले नाही. दुकानदाराशी संपर्क साधला असता, आणखी तीन ते चार दिवसात पॅकेट उपलब्ध होतील.

' अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. आणखी तीन- चार दिवस अर्थात त्यानंतर दिवाळीस केवळ चार ते पाच दिवस शिल्लक राहतील. इतक्या कमी वेळेत नागरिकांकडून कसे फराळ तयार होणार, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना जर खरंच सामान्य नागरिकांची दिवाळी गोड करावयाची होती, तर घोषणा होताच दोन ते तीन दिवसात अशा प्रकारचे पॅकेट प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

हेही वाचा: Nashik Bus Fire Accident: हॉटेल मिरची चौकात रस्ता रुंदीकरणासह गतिरोधकाचे काम

तसे झाले नसल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यातील बहुतांशी नागरिकांनी त्या पॅकेजच्या भरवशावर न राहता कर्ज काढून का होईना, दिवाळी फराळाचे साहित्य किराणा दुकानातून खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा यापुढेही घोषणाच राहते की मग येणाऱ्या दोन- तीन दिवसात हे पॅकेट उपलब्ध होता, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

"दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेले पॅकेट स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झालेले नाही. त्यांनी घोषणा करून सामान्य जनतेला केवळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे." - सचिन गायकवाड, लाभार्थी

हेही वाचा: SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा