Maharashtra International Trade Expo | उद्योजक, व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देणार : CM एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde News

Maharashtra International Trade Expo | उद्योजक, व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देणार : CM एकनाथ शिंदे

नाशिक : उद्योजक, व्यापारीस्नेही सरकार आहे. त्यांच्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही. उद्योगाला काय हवे आहे, हे सरकारला माहिती आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने राज्याच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.

भविष्यातही महाराष्ट्र चेंबरचे सहकार्य राहणारच आहे. त्यामुळे काळजी करू नका, उद्योग, व्यापाराला लागणाऱ्या सर्व सुविधा देऊन येत्या काही दिवसांत महाराष्ट्र एक क्रमांकाचे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (CM Eknath Shinde statement Maharashtra International Trade Expo inauguration nashik news)

राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे १७ फेब्रुवारीपासून ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स)चा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी झाला.

त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत हा एक्स्पो सुरू राहणार असून, त्याची सकाळी ११ ते रात्री ९, अशी वेळ राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्रीअंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण आहे. आमचे सरकार हे सामान्य नागरिकांचे उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योगवाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे.

मायटेक्स देशभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो भरविले आहे. गेल्या सात महिन्यांच्या काळात सध्याच्या सरकारने उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे.