esakal | चिंतामुक्त शेतकरी आणि शेतकरीकेंद्रित कृषीविकास यावर सरकारचा भर : मुख्यमंत्री ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray.jpg

चिंतामुक्त शेतकरी आणि शेतकरीकेंद्रित कृषीविकास यावर सरकारचा भर आहे. कोरोना विषाणू संसर्गात शेतकऱ्यांनी दाखविलेले धैर्य मोठे आहे. शेतकऱ्यांना हमखास भाव मिळावा म्हणून स्मार्ट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा.

चिंतामुक्त शेतकरी आणि शेतकरीकेंद्रित कृषीविकास यावर सरकारचा भर : मुख्यमंत्री ठाकरे

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनांचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १०) करण्यात आला. त्यानिमित्त यूट्यूब चॅनलद्वारे राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी, विकला जाईल तो शेतमाल पिकविण्याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. गटशेतीच्या माध्यमातून संघटित व्हावे, असे सांगत असतानाच शेती उद्यमशील व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे : ऑनलाइन संवादासाठी वडगावच्या शेतकऱ्याची निवड

मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवादासाठी वडगाव (ता. सिन्नर) येथील शेतकरी अनिल शिंदे यांची निवड करण्यात आली होती. कृषी विभागाच्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले, की चिंतामुक्त शेतकरी आणि शेतकरीकेंद्रित कृषीविकास यावर सरकारचा भर आहे. कोरोना विषाणू संसर्गात शेतकऱ्यांनी दाखविलेले धैर्य मोठे आहे. शेतकऱ्यांना हमखास भाव मिळावा म्हणून स्मार्ट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

विकला जाईल तो शेतमाल पिकविण्याकडे द्यावे लक्ष
पालघर, अकोला, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. असे प्रकल्प राज्यभर राबविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, अदिती तटकरे, सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. श्री. भुसे यांनी प्रास्ताविक केले. भविष्यात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेच्या आधारे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात फलोत्पादन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती भुमरे यांनी दिली. कदम यांनी आभार मानले.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - ज्योती देवरे

loading image