नाशिक- काही दिवसांपासून शहरातील पंपांवर निर्माण झालेला सीएनजीचा तुटवडा अद्यापही कायम आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासन देऊनही अद्याप मुबलक पुरवठा होत नसल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी (ता. २६) मुंबई- आग्रा महामार्गावरील कंपनीच्या पंपाबाहेर वाहनांची लांब रांग लागल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले.