esakal | संपूर्ण देशात कोळसा टंचाई! बहुतांश वीज केंद्र चिंताजनक स्थितीत
sakal

बोलून बातमी शोधा

coal

देशात कोळसा टंचाई! 135 पैकी 91 विज केंद्र अडचणीत

sakal_logo
By
नीलेश छाजेड

एकलहरे (जि.नाशिक) : कोळसा अभावीदेशातील सतरा राज्यातील 135 वीज केंद्रापैकी 46 विज निर्मिती केंद्र क्रिटिकल व 45 केंद्र सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. पावसाळ्याच्या प्रारंभात वीज केंद्राच्या क्षमते नुसार 20-25 दिवसांचा कोळसा शिल्लक असणे आवश्यक असते. परंतु आता कोळसा वाटप समान पद्धतीने व सात दिवसांचाच कोळसा केंद्रात ठेवण्यात यावा हा निर्णय झाला आहे. गत महिनाखेरीस झालेल्या दिल्लीत झालेल्या बैठकीत कोळसा कमतरता दूर करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक व ऊर्जा मंत्रालय व विद्युत प्राधिकरण यातील सदस्य राहणार आहेत. परंतु अजून परिस्थितीत सुधारणा झालेली दिसून येत नाही.

देशातील 135 पैकी 91 विज केंद्र क्रिटिकल, सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये

त्यात खाणींमध्ये पाणी असल्याने कोळसा उत्खननात अडचणी येतात. व इतरही अडचणींमुळे विज निर्मिती या काळात अडचणीत येतांना दिसून येते. हरियाणा राज्यात 5 वीज केंद्रापैकी 2 क्रिटिकल, तर 1 सुपर क्रिटिकल कंडिशन , पंजाब मध्येही वरील प्रमाणेच परिस्थिती आहे. राजस्थान मध्ये 4 विज केंद्रापैकी 1 क्रिटिकल तर 3 सुपर क्रिटिकल, उत्तर प्रदेश मध्ये 19 पैकी 5 क्रिटिकल तर 10 सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. छत्तीसगड येथे 16 पैकी 7 क्रिटिकल व 6 सुपर क्रिटिकल, गुजरात मध्ये 4 पैकी 2 विज केंद्र क्रिटिकल व 1 सुपर क्रिटिकल , मध्य प्रदेश 10 केंद्रांपैकी 1 क्रिटिकल व 5 सुपर क्रिटिकल परिस्थितीत आहे.

हेही वाचा: अवघ्या २२ व्‍या वर्षी झाला 'सीए'! थक्क करणारा प्रवास

महाराष्ट्रातील 16 पैकी 4 क्रिटिकल तर 10 सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये

महाराष्ट्र 16 विज केंद्रापैकी 4 क्रिटिकल व 10 सुपर क्रिटिकल , आंध्र 6 पैकी 1 क्रिटिकल 3 सुपर क्रिटिकल , कर्नाटक 4 पैकी 2 क्रिटिकल व 2 सुपर क्रिटिकल, तामिळनाडू त 6 पैकी 4 क्रिटिकल तर तेलंगाणा त 6 पैकी फक्त 1 सुपर क्रिटिकल परिस्थितीत आहे.बिहार 6 पैकी 4 क्रिटिकल 1 सुपर, झारखंड 7 पैकी 3 क्रिटिकल व 1 सुपर, ओरिसा 6 पैकी 2 क्रिटिकल व 1 सुपर, पश्चिम बंगाल 14 पैकी 6 क्रिटिकल व 2 सुपर क्रिटिकल व आसाम 1 वीज केंद्र निरंक अशी परिस्थिती आहे. अशी एकंदर देश भरातील विज केंद्रांची परिस्थिती आहे.

शिल्लक कोळसा/ वीज/क्षमता

(दिवस)

क्रिटिकल/सुपर / केंद्र/ मेगावॅट

0 दिवस/ 4 4840

1 दिवस/ 10 13522

2 दिवस / 16 15085

3 दिवस / 17 21200

4 दिवस / 19 22090

5 दिवस / 9 12490

6 दिवस / 14 18020

7 दिवस / 2 2580

91 109827

हेही वाचा: नाशिक : पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

क्रिटिकल कंडिशन मध्ये 3 ते 5 दिवसांचा कोळसा शिल्लक तर सुपर क्रिटिकल मध्ये 0 ते 3 दिवसांचा कोळसा शिल्लक धरला जातो. देशातील वीज केंद्रांना डब्ल्यू सी एल, एम सी एल, एस इ सी एल, एस सी सी एल, सी आय एल आदी कोळसा खान कंपन्यांकडून पुरवठा केला जातो

loading image
go to top