esakal | अवघ्या २२ व्‍या वर्षी 'तो' झाला 'सीए'! तिन्‍ही टप्‍यांत पहिल्‍या प्रयत्‍नात यश
sakal

बोलून बातमी शोधा

ca agam shah

अवघ्या २२ व्‍या वर्षी झाला 'सीए'! थक्क करणारा प्रवास

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळाले की वेध लागतात ते विज्ञान शाखेत प्रवेशाचे. मग डॉक्‍टर, अभियंता किंवा यासारख्या प्रचलित करिअर पर्यायांचा विचार होतो. मात्र, आगम शहा याने वाणिज्‍य शाखेत प्रवेश घेतला. जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर तो वयाच्‍या अवघ्या २२ व्‍या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाला आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

थक्क करणाऱ्या यशाचा प्रवास

रंगुबाई जुन्नरे इंग्‍लिश मीडियम स्‍कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आगम याने बीवायके महाविद्यालयात प्रवेश घेतल्‍यानंतर अकरावीपासून सीए परीक्षांच्‍या तयारीला सुरवात केली. तयारीच्‍या पहिल्‍या दिवसापासून अभ्यासात सातत्‍य ठेवले. आगमचे वडील निकेश शहा निवृत्त झाले असून, आई शिल्‍पा शहा गृहिणी, तर अभियंता बहीण क्रिमा नोकरी करीत आहे.

प्रत्‍येक टप्प्‍यावर क्रमवारीसह यश

केवळ उत्तीर्ण होण्यापलीकडे आगमने सीए होण्याच्‍या प्रत्‍येक टप्प्‍यात क्रमवारी पटकावली. सीपीटी परीक्षेत अवघ्या एका गुणाच्‍या फरकामुळे आगम नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. आयपीसी परीक्षेत मात्र त्‍याने कसर भरून काढताना राष्ट्रीय क्रमवारीत ३१ वा क्रमांक पटकावला होता. तर अंतिम परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत ४६ व्‍या क्रमांकासह यश मिळविले.

हेही वाचा: महाराष्ट्राची फॉग सिटी 'इगतपुरी'! पर्यटकांचे आकर्षण

विज्ञान शाखेची फारशी आवड नसल्‍याने चांगले गुण मिळूनही जाणीवपूर्वक वाणिज्‍य शाखेत प्रवेश घेतला. सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्‍या प्रयत्‍नांमध्ये व अभ्यासात सातत्‍य ठेवावे. मीही सरासरी आठ ते नऊ तास दैनंदिन अभ्यास करून हे यश मिळविले आहे. - आगम शहा, विद्यार्थी

loading image
go to top