Winter Skincare : हिवाळ्यासाठी खोबरेलतेल वरदान!; खोबरेलतेल ठेवते त्‍वचा मुलायम!

Coconut Oil
Coconut Oilesakal

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीत अभ्‍यंगस्‍नानात खोबरेलतेलास महत्त्व असून, हिवाळ्यात त्‍वचा कोरडी पडू लागते. अशा त्‍वचेच्या रक्षणासाठी ऋतुनुसार आपल्‍या संस्‍कृतीत अभ्‍यंगस्‍नानाला महत्त्व आहे. त्यात औषधी गुणधर्माच्या खोबरेलतेलाचा वापर केला जातो. खोबरेलतेलाने त्वचा मुलायम अन् तुकतुकीत राहाते. हिवाळ्यात त्वचेच्या रक्षणासाठी खोबरेलतेलाचा आवर्जून वापर करावा, असे आयुर्वेदातही म्हटले आहे. (Coconut oil keeps Skin Care soft during Winter Nashik news)

तेल प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी घाण्याच्या शुद्ध खोबरेलतेलाचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. खोबरेलतेलामुळे त्‍वचेला ‘मॉश्चराइज’ होते आणि त्‍वचा मुलायम होते. उष्‍णतेचा विकार अथवा पित्त प्रकृतीसाठी खोबरेलतेल गुणकारी आहे. श्रीफळाच्या मांस व बल वृद्धी या गुणांमुळे शरीराचे पोषण उत्तम होते. कुपोषणात खोबरेलतेलाचा वापर सकारात्मक परिणाम देतो. खोबरेलतेलाचा सुगंध मनाला, हृदयाला भावणारा असल्‍याने मन आल्हाददायक व आनंदी राहाते.

खोबरेलतेलातील घटक

खोबरेलतेलात ‘क्लिंजिंग’ व ‘फोमिंग’ घटक असल्याने चेहऱ्यावरील मृतपेशी व घाण निघून जाते. खोबरेलतेलात सूज कमी करणारे, तसेच जीवाणूविरोधी घटक असल्‍याने त्‍वचेचे संसर्गापासून संरक्षण होते. यामुळे ‘एटॉपिक डर्मेटाइटिस’ या त्वचा विकारावर खोबऱ्‍याचे तेल उपयुक्त मानले गेले आहे. खोबरेलतेलात ‘ई’ जीवनसत्त्व असल्याने डोळ्यांभोवती असणारे काळे वर्तुळे व डाग यावर फायदेशीर ठरते. ‘ॲन्टीबॅक्‍टेरीयल’ गुणधर्मामुळे त्‍वचेवरील मुरमाची समस्‍या दूर होते.

खोबरेलतेलाचे फायदे

त्‍वचेवर येणारी पुरळ अथवा पुटकुळ्यांच्या समस्येवरही खोबरेलतेल गुणकारी आहे. त्‍वचा बुरशीजन्य संसर्गाने त्रस्‍त असल्‍यास खोबरेलतेलात दोन ते चार लवंगा गरम करून तेल थंड झाल्‍यावर त्‍वचेवर लावावे. हल्‍लीच्या जीवनशैलीमुळे लहान वयातच त्‍वचेवर सुरकुत्‍या येतात. खोबरेलतेल व लवंग हे ‘कोलॅजन’चे प्रमाण वाढवणारे घटक म्‍हणजेच वृधत्‍वाविरोधी ‘एजंट’ म्‍हणून उपयोगी आहेत.

यासाठी लवंगमिश्रित खोबरेलतेल रात्री झोपताना लावल्‍यास त्‍याचा फायदा होतो. दिवसभरातील थकवा, ताण यापासून आराम मिळण्यासाठी रात्री झोपताना खोबरेलतेलाने चेहऱ्यावर मसाज केल्‍यास (कपाळावरील मसाजाने) थकवा दूर होतो. तळपायाला मसाज केल्‍याने पूर्ण शरीराच्या आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते.

Coconut Oil
Nashik ZP Recruitment : नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 2 हजार जागांची भरती

नालिकेरं हिमं स्‍निग्‍धं स्‍वादुपाकरसं गुरू।

तर्पणं पाचनं वृष्‍यं बृंहणं बलमांसकृत ।।

अर्थात, नारळाचा बर्फासारखा शुभ्र पांढरा गर अथवा दुधाचा स्‍वाद तथा चव मधुर असते. पचनास सोपा, शरीरातील बल व मांसवृद्धीस उपयुक्‍त आहे. नारळाचा गर बल व मांसवृद्धीस अतिशय उपयुक्त आहे.

खोबरेलतेलाचा वापर

चेहरा पाण्याने धुऊन स्‍वच्छ करावा. आवश्‍यक तितके (साधारणतः चमचाभर) तेल घ्‍यावे. तळहातावर तेल चोळून घेत चेहरा व मानेला हलकासा मसाज करत लावावे. मसाजाने तेल त्‍वचेत जिरते. ‘नाइट क्रीम’ऐवजी खोबऱ्याच्या तेलाने मसाज केल्‍यास त्‍वचा घट्ट होते. सुरकुत्‍या पडत नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मसाज केल्‍यास याचा फायदा जलदगतीने होतो.

"हिवळ्यात खोबरेलतेल कोमट करून वापरल्याने तारुण्य टिकते. त्‍वचेवर वार्धक्‍याच्या सुरकुत्‍यांपासून बचाव होतो. तसेच पित्त प्रकृतीत अथवा उष्‍णतेचे विकार असणाऱ्यांसाठी खोबरेलतेल फायद्याचे ठरते. कुपोषित बालकांना खोबरेलतेल पिण्यास दिल्‍यास त्‍यांचे पोषण चांगले होते. वजन वाढते." -प्रा. वैद्य एकनाथ कुलकर्णी (आयुर्वेद सेवा संघ)

Coconut Oil
Inspirational : मॅरेथॉन जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगत तो धावतोय; रोज 30 किलोमीटर पायी प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com