Nashik winter update
Sakal
नाशिक: राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला असून, रविवारी (ता. ९) राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान धुळे येथे ८.६ अंश, त्याखालोखाल जळगाव दहा आणि निफाड येथे ११ अंश तापमान नोंदविले गेले आहे. नाशिक शहर व परिसरातही पाऱ्यातील घसरण कायम आहे. रविवारी (ता. ९) नाशिक शहरात किमान तापमान १२.५ अंशांपर्यंत खाली आले.