Ayush Prasad
sakal
नाशिक: बालविवाह ही सामाजिक समस्या असून या प्रवृत्तीला प्रतिबंध करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात बालविवाह झालेली ठिकाणे शोधावीत, बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा तयार करताना कठोर पावले उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. बालविवाह विरोधातील मोहिमेवरुन प्रसाद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना दर महिन्याला आढावा घेणार आहे. कामात सुधारणा करावी, असाही इशारा दिला.