"नियम न पाळल्यास अत्यावश्‍यक सेवाही बंद करू"..

suraj-mandhre 1234.jpg
suraj-mandhre 1234.jpg

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक असताना, संचारबंदीच्या काळातही नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्यास अत्यावश्‍यक सेवाही बंद कराव्या लागतील, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 31) दिला. 

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनाही वाटाण्याच्या अक्षता
कोरोना विषाणूवर अद्याप कुठलीही लस उपलब्ध नसल्याने प्रतिबंधाद्वारे फैलाव रोखता येऊ शकतो. मात्र, संचारबंदी जाहीर केलेली असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यासाठी अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीचे कारण पुढे केले जात आहे. किराणा, दूध, भाजीपाला आदींच्या खरेदीसाठी गर्दी कमी होताना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास जीवनावश्‍यक, अत्यावश्‍यक सेवादेखील बंद करण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय राहणार नसल्याचे श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले. 

..तर इंधनावरही बंदी 
जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानुसार दुचाकी वाहनात शंभर, तर चारचाकी वाहनात प्रतिदिन एक हजार रुपयांच्या इंधनाची मर्यादा घातली आहे. असे असतानाही नागरिक जादा इंधन भरत आहेत. त्यामूळे इंधन मर्यादेचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नांदेड, बीडच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल देण्यावर बंदी घालण्याचा विचारदेखील जिल्हा प्रशासन करत आहे. 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

महत्त्वाच्या प्रशासकीय घडामोडी... 
* पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पन्नास जणांची तपासणी 
* लासलगाव परिसरात 20 पथकांद्वारे तपासणी 
* साशंकता असलेल्यांनी स्वतः होम क्वारंटाइन होण्याचे आवाहन 
* परिसरनिहाय ठराविक क्‍लिनिक केवळ श्‍वसनाच्या आजारांसाठी करणार आरक्षित 
* शेल्टरचा 972 स्थलांतरितांचा आधार, शासनाकडून विविध सुविधा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com