Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणाच्या पाण्याचा रंग बदलतोय; पर्यावरणप्रेमींना दूषित पाण्याचा संशय

color of Gangapur dam water is changing nashik news
color of Gangapur dam water is changing nashik newsesakal

Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणातून पाणी सुटल्यानंतर सोमेश्वर धबधब्यापासून कारखान्यांचे केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीत मिसळते असे बोलले जात असले तरी आता गंगापूर धरणाचेच पाणी दूषित होत असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींना आहे.

धरण्याच्या पाण्याचा रंग बदलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात संशय व्यक्त करताना शुध्द व निर्मळ पाण्यासाठी नाशिककरांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. (color of Gangapur dam water is changing nashik news)

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून जवळपास ६५ टक्के शहराला पाणीपुरवठा होतो. एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, एमआयडीसी तसेच गंगापूर कालव्यातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणाच्या पाण्याची ख्याती आहे. पाणी शुध्द, निर्मळ व गोड आहे. गोदावरी नदी सोमेश्वर धबधब्याजवळ प्रवाहित होते. तेथून मात्र नदीच्या सौंदर्याला गालबोट लागते.

नदीत नाले मिसळले असल्याने पाणी दूषित होते. आता नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे, तर मलनिस्सारण केंद्राला जोडणाऱ्या ड्रेनेजलाइन नवीन टाकण्याबरोबरच केंद्रांची क्षमता वाढविली जाणार आहे. एकीकडे गोदा स्वच्छतेसाठी मोहीम आखली जात असताना आता गंगापूर धरणाच्या पाण्याबद्दलच संशय व्यक्त केला जात आहे.

आपलं पर्यावरण संस्थेचे व वृक्षप्रेमी शेखर गायकवाड गेल्या पंधरा दिवसांपासून गंगापूर धरणाच्या येथे जात आहे.

color of Gangapur dam water is changing nashik news
Nashik News : पिंझारघाट महापालिका जलकुंभाखाली गांजाची झाडे

येथे काही भागात निर्मळ पाणी, तर बोट क्लबच्या बाजूला हिरवट व पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तवंग आल्याचे दिसून येत असल्याची नोंद त्यांनी घेतली. एका भागात नितळ तर दुसऱ्या भागात हिरवट पाणी दिसून येत आहे.

त्यामुळे धरणाचे पाणी दूषित होत असल्याची बाब खेदाने नोंदवावी लागतं असल्याचे त्यांनी ‘सकाळ’कडे सांगितले. त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमधून नदी नाल्यातून गंगापूर धरणात पाणी येताना विविध वनस्पतींना स्पर्श करून, त्यांचे उपयुक्त घटक आपल्या बरोबर घेऊन धरणात साठा होत होता. आरोग्यासाठी ते योग्यदेखील होते. परंतु आता तशी परिस्थिती नसल्याचे मत गायकवाड यांनी नोंदविले.

"गंगापूर धरण प्रदूषणाच्या विळख्यात असे खेदाने नमुद करावेसे वाटते. धरणातील पाण्याचा रंग बदलत आहे. पाणी प्रदूषित होत आहे. त्यावर हिरवट वेगळाच तवंग काही बाजूने दिसत आहे. पाणी असा रंग का बदलत आहे, याची कारणे शोधून वेळीच अमृत कुंभाप्रति जागरूक झाले पाहिजे. आज परिस्थिती आटोक्यात आहे, उशीर झाल्यास हाताबाहेर जाईल. जलपूजनाबरोबरच जलशुद्धीकरणावर लक्ष देणे गरजेचे आहे." - शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था.

color of Gangapur dam water is changing nashik news
Sakal Exclusive : शहरात भाजीपाला, कपड्यांचा कचरा अधिक; ओला 60, तर कोरडा कचऱ्याचे 40 टक्के संकलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com