येवला शहरात कोम्बिंग ऑपरेशन; 2 तलवारी जप्त, 16 वाहने ताब्यात Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seize

येवला शहरात कोम्बिंग ऑपरेशन; 2 तलवारी जप्त, 16 वाहने ताब्यात

येवला (जि. नाशिक) : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिस निरीक्षक भगवान मथुरेंसह पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान तलवारी जप्त (Seize) करण्यात आल्या असून, १६ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

हेही वाचा: Operation Ganga : उद्या युक्रेनमधून ७ विमाने दिल्लीत पोहोचतील

शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी सातला जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (District Superintendent of Police Sachin Patil) यांच्या सूचनेनुसार मनमाड (Manmad) पोलिस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या आदेशान्वये शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. काही दिवसांपूर्वी शहरात चेन स्नॅचिंगच्या (Chain Snatching) घटना सलग घडल्या होत्या. त्यातच आगामी सण-उत्सव या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यासाठी प्रामुख्याने हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

हेही वाचा: Operation Ganga: सूमी शहरातून सातशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु

या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शहरातील जुन्या पंचायत समिती समोरून एकाच्या ताब्यातून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या. यानंतर लक्कडकोट भागातून १५ मोटारसायकलींसह ओम्नीकार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच वाहने मूळ मालकांना परत केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. या कोम्बिंग ऑपरेशनच्या कारवाइत मथुरेसह सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे,पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्यासह २२ पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी व दहा होमगार्ड आदींनी भाग घेतला. शहरात छोट्या-मोठ्या घटना वाढल्या असून दादागिरी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्यांतून स्वागत होत आहे.

Web Title: Combing Operation In Yeola City Nashik Police News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..