
Operation Ganga: सूमी शहरातून सातशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली : भारताने युक्रेनच्या उत्तर पूर्व भागातील शहर सूमीमधून ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यावेळी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असून सगळ्यांचीच सुटका शक्य झाली नाहीये. रशियाने भीषण गोळीबार आणि हवाई हल्ले सुरुच ठेवल्याने त्यांची सुटका करणं अवघड होऊन बसलं आहे. (Operation Ganga)
हेही वाचा: आम्ही परत येऊ देतो का? शरद पवार यांचा फडणवीसांना टोला
युक्रेनमध्ये भारतीय दुतावासाने म्हटलंय की, ऑपरेशन गंगा मिशनची एक टीम पोल्टावा शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना सुमीमध्ये पोल्टावाच्या रस्त्याने पश्चिम सीमेपर्यंत सुरक्षित मार्गाने नेण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. तसेच विद्याार्थ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर तात्काळ रवाना होण्यासाठी तयार आहे.
गतीने सुरु आहे ऑपरेशन गंगा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये १३ फ्लाईट्समधून जवळपास २५०० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय की, हंगेरी, रोमानिया आणि पोलंडमध्ये अडकलेल्याा भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील २४ ताासांमध्ये सात फ्लाईट्स भारतीयांना घेऊन येणार आहेत. बुडापेस्टमधून पाच उड्डाणे असतील, पोलंडमध्ये रेजजो आणि रोमानियामध्ये सुचेवामधून एक-एक फ्लाईट्स निघणार आहेत.
हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मार्च 2022
जवळपास २० हजार भारतीय भारतात आले
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धसंघर्ष सुरु व्हायच्या काही आठवडे आधी सूचना जारी केल्यानंतर ते आतापर्यंत २१ हजारहून अधिक भारतीय युक्रेनमधून निघाले आहेत. यामधील १९,९२० भारतीय याआधीच भारतात पोहोचले आहेत.
Web Title: India Continuing Efforts To Evacuate Over 700 Students From Sumy Ukraine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..