esakal | बकरी ईदसाठी मालेगाव महापालिका सज्ज; आयुक्तांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Municipal Corporation

बकरी ईदसाठी मालेगाव महापालिका सज्ज; आयुक्तांची माहिती

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात २१ ते २३ जुलैदरम्यान बकरी ईद साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरीच नमाजपठण व जनावरांची कुर्बानी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वेळी कुर्बानीसाठी तात्पुरते कत्तलखाने नसले तरी महापालिका प्रशासनाने चार प्रभागांत १८ वेगवेगळ्या ठिकाणी कचरा, मांस, आचरट जमा करण्यासाठी ठिकाणे निर्धारित केली आहेत. यासाठी १८ स्वच्छता निरीक्षकांची खास नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईदसाठी महापालिका सज्ज असून, सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्याचे आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील यांनी कळविले आहे. commissioner informed that Malegaon Municipal Corporation is ready for bakari eid

पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १६) बकरी ईदनिमित्त महापालिका सभागृहात आढावा बैठक झाली. या वेळी पाणी, स्वच्छता, पथदीप आदींचा व तयारीचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. संबंधित विभागप्रमुख व स्वच्छता निरीक्षक यांनी केलेल्या नियोजनासंदर्भात काही समस्या असल्यास त्यावर तातडीने उपायोजना व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, अनिल पारखे, लेखाधिकारी राजू खैरनार, आरोग्याधिकारी अमोल दुसाने, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, पाणीपुरवठा उपअभियंता जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल, हरीश डिंबर, जगदीश बडगुजर आदींसह प्रमुख स्वच्छता निरीक्षक, वाहन विभागप्रमुख, वॉटर ग्रेस व दिग्विजय एंटरप्राईजेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २५७ रुग्ण कोरोनामुक्‍त

कुर्बानीचा कचरा व आचरट टाकण्यासाठी निश्‍चित केलेली ठिकाणे :

प्रभाग १ : मोहंमद इसहाक चौक, बागे ए महेफुज,

प्रभाग २ : इद्दु मुकादम चौक, अक्सा कॉलनी-पाक पंचतन चौक, सना मेडिकल चौक, हजारखोली गार्डन, म्हाडा कॉलनी, मर्चंटनगर, इकरानगर, सलीमनगर शौचालय, कालीकुट्टी मैदान,

प्रभाग ३ : ताबानी गल्ली, मोती तालाब, मच्छी बाजार, सरदारनगर, अजमल ग्राउंड, अजिज कल्लू स्टेडियम, खलील हायस्कूल, जुने बीफ मार्केट, बकरा मार्केट- तीन कंदील, चंदनपुरी गेट, किल्ला खंदक, मोचीपुरा, जाफरनगर वखार, गुलाब पार्क,

प्रभाग ४ : अदिब रोड, मुकुंदवाडी शौचालय, सैलानी चौक, रौनकाबाद शौचालय, अली अकबर मैदान, साठफुटी रोड मैदान, गुलशेरनगर शौचालय, गुलशने इब्राहिम, साबरा हज्जीन मशिदजवळ.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image