नाशिक : १३ जूनपासून पुन्‍हा वाजणार शाळेची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

१३ जूनपासून पुन्‍हा वाजणार शाळेची घंटा

नाशिक : महापालिका (nmc) क्षेत्रातील शाळांच्‍या उन्‍हाळी सुटीच्‍या मुदतीत बदल जाहीर केला आहे. त्‍यानुसार सोमवार (ता.२) पासून शाळांना उन्‍हाळी सुट्टी लागेल. १२ जूनपर्यंत सुट्या असल्‍याने १३ जूनपासून पुन्‍हा शाळांमध्ये वर्ग भरतील. यासंदर्भात महापालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सुधारित परिपत्रक जारी केले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन केला सन्मान

यापूर्वी जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार शाळांना (school) उन्‍हाळी सुट्या ६ मेपासून जाहीर केलेली होती. परंतु पुण्यातील प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाचे संचालक यांच्‍या पत्रान्‍वये उन्‍हाळी सुट्यांच्‍या मुदतीत बदल केलेला आहे. त्‍यानुसार आता सोमवार (ता.२) पासून शाळांना उन्‍हाळी सुट्या लागतील. यापूर्वी ६ मे ते १४ जूनदरम्‍यान उन्‍हाळी सुट्या होत्‍या. परंतु आता सुधारित आदेशानुसार सोमवार (ता.२) पासून १२ जूनपर्यंत शाळांना सुट्या असतील. व १३ जूनपासून प्राथमिक शाळा नियमितपणे सुरु होऊन शालेय प्रांगण विद्यार्थ्यांनी पुन्‍हा गजबजणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्‍या सूचनांनुसार शनिवारी (ता.३०) शहरातील काही शाळांकडून निकालपत्राचे वाटप करण्यात आले. तर काही शाळांकडून उद्या (ता.१) निकाल वाटप करणार आहेत. यासंदर्भातील नियोजन आखण्यात आलेले आहे.

हेही वाचा: शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?

Web Title: Schools Again From June 13 In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top