esakal | मामाने केला विश्वासघात! शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीचे परस्पर लावले लग्न

बोलून बातमी शोधा

wedding
मामाने केला विश्वासघात! शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीचे परस्पर लावले लग्न
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : चिंचावड (ता. मालेगाव) येथे मामाकडे मोठ्या विश्‍वासाने शिक्षणासाठी ती भाची आपल्या मामाकडे आली होती. पण तिला तरी काय माहित? सख्खा मामाच तिच्यासोबत विश्वासघात करणार आहे.

मामाने केला विश्वासघात!

चिंचावड (ता. मालेगाव) येथे मामाकडे मोठ्या विश्‍वासाने शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीचा मामाने गावातील ओळखीच्या तरुणाशी विवाह लावून दिला. मुलीच्या आई-वडिलांना विश्‍वासात न घेता मामाने संगनमत करून विश्‍वासघात करीत गावातीलच तरुणाशी विवाह करून दिला. भिकाबाई अहिरे (वय ४५, रा. कौळाणे, ता. मालेगाव) यांनी १५ वर्षे वयाच्या मुलीला शिक्षणासाठी चिंचावड येथे भाऊ दादाजी ऊर्फ पिंटू बच्छाव याच्याकडे पाठविले. मामाने अल्पवयीन भाचीचे वैभव निकम (रा. चिंचावड) याच्याशी लग्न लावून दिले.

हेही वाचा: खाकीच्या रुपात धावले देवदूत! चालत्या ट्रेनमध्ये अडकलेल्या वृध्दाला वाचविले; पाहा VIDEO

मुलीच्या आईला समजला प्रकार; सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर अहिरे यांनी भाऊ पिंटू बच्छाव, वर वैभव निकम, वरपिता ज्ञानेश्‍वर निकम, पुरोहित राजेंद्र कुलकर्णी, वराची आई व वराचा मित्र (दोघांची नावे समजू शकली नाहीत, सर्व रा. चिंचावड) या सहा जणांविरुद्ध तक्रार दिली. २२ मार्चला चिंचावड येथे विवाह पार पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मामा, वर, वरपिता, पुरोहितसह वराचा मित्र अशा सहा जणांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला

हेही वाचा: कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात