esakal | रुग्ण पतीला गंडविले; कोट्यवधीची संपत्ती हडप केल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

रुग्ण पतीला गंडविले; कोट्यवधीची संपत्ती हडप केल्याचा आरोप

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : रुग्ण पतीला चौघांनी गंडविल्याची तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणी दांपत्यांसह चौघाविरोधात पत्नीच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेमके काय घडले? (complaint-of-fraud-with-patient-marathi-news-jpd93)

स्वाक्षऱ्या घेऊन गैरव्यवहार

मंजीतकौर चढ्ढा यांच्या तक्रारीनुसार १८ जून ते १० जुलैदरम्यान त्यांचे पती ओपोला रुग्‍णालयात दाखल केले होते. त्या वेळी १० जुलैला सायंकाळी सहाला रुग्‍णालयातून अनंत पंढरीनाथ सांगळे (३७) रामदास संतू गोरे (३६), अभिजितसिंग जितेंद्रसिंग गुजराल (३६) यांनी डिस्चार्ज घेतला. त्यात रुग्णालयाचे सुमारे सात लाखांचे बिल त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून भरले. त्यांच्या पतीच्या एटीएममधून पैसे काढून घेतले. याशिवाय चौघांनी बँकेच्या खात्यातून १५ लाख रुपये काढले. कारच्या चाव्या घेतल्या. वेगवेगळ्या दुकानांचे २० लाखांचे भाडे गुजराल परस्पर घेत आहेत. गंगापूर रोड भागातील २० गुंठे जमिनीचे कागदपत्र अनंत सांगळे यांना दिले. दमबाजी करून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. कोट्यवधीची संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे. हे सगळे पतीला दवाखान्यातून रुग्णालयात नेतांना त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन गैरव्यवहार केल्याची तक्रार महिलेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी दांपत्यांसह चौघाविरोधात मंजीतकौर जसपालसिंग चढ्ढा (४४, सेठी निवास, शिंगाडा तलाव) यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image