esakal | प्रवासात गाडीच्या बॉनेटवर चढला 6 फुटी साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

sneak on car

गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : साप दिसला की भल्या भल्यांची पाचावर धारण बसते असाच एक अनुभव नाशिक येथील  रत्नदीप सिसोदिया यांना महामार्गावरून प्रवास करत असताना आला. चक्क कारच्या बॉनेटवर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत सापाने प्रवास केल्याची घटना घडली. (travels-with-snake-two-kilometers-on-bonnet-of-car-marathi-news-jpd93)

गाडीच्या बॉनेटवर चढून सापाचा तब्बल दोन किलोमीटर प्रवास

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक रत्नदीप सिसोदिया हे (ता.११) रविवारी परिवारासह मुंबई-आग्रा महामार्गाने मध्यप्रदेश येथील एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. परत येत असताना शिरपूर (धूळे) जवळ त्यांना गाडीच्या बॉनेटवर सहा फुटी धामण जातीचा साप दिसला त्यांनी त्वरित गाडीच्या काचा वर घेत वेग कमी केला व रस्त्यालगत असलेले महामार्ग पोलिसांच्या चौकीवर चारचाकी नेली महामार्ग पोलिसांनी त्वरित सर्पमित्र प्रेम बिर्‍हाडे यांना पाचारण केले. तोपर्यंत साप गाडीच्या खाली आतमध्ये शिरला होता. गाडी त्वरित महामार्ग लगत असलेल्या सर्विस स्टेशन वर नेत रॅम्पवर चढवली व गाडीच्या खालच्या बाजूने सहा फुटी धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडून  जंगलात सोडण्यात आले. या धामण जातीच्या सापाबद्दल सर्पमित्र यांनी इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. सापाला सर्पमित्रांनी ताब्यात घेतल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. महामार्ग पोलीस व सर्पमित्र यांच्या मदतीने सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

loading image