दहावी, बारावीची परीक्षा घ्यायची की जनगणना? शिक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार 

Concerns among teachers as board exams and census come together nashik marathi news
Concerns among teachers as board exams and census come together nashik marathi news

बिजोरसे (जि. नाशिक) : लॉकडाॅऊनमुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात होणारी जनगणना पार पडली नाही. कोरोनामुळे जनगणनेच्या कामातून शिक्षकांची तात्पुरती का होईना सुटका झाली असली तरी आता येणाऱ्या एप्रिल - मे महिन्यात शिक्षकांच्या डोक्यावर जनगणना कामाची टांगती तलवार आहे. 

तर शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार..

कोरोना महामारीत शाळा - महाविद्यालये बंद होती. ऑनलाइन प्रणीलीद्वारे शिक्षण दिले जात असले तरी आता कोरोनावरील लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनावर आळा बसण्यास आता निश्‍चितच मदत होणार आहे. राज्य सरकारने आज (ता.४) पासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच काळात दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार असून, शिक्षणमंत्र्यांनीही यंदा उशिराने म्हणजेच एप्रिल मे महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. जनगणना आणि बोर्डाच्या परीक्षा एकाचवेळी आल्यास शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागेल. 
आता जनगणना कामाच्या हालचाली सुरू झाल्या असून, अद्याप केंद्र सरकारकडून सूचना आलेल्या नाहीत. २०११ मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर मार्च - २०२० मध्ये जनगणना होणार होती. पण, कोरोनामुळे ती होवू शकली नाही. परंतु, यावर्षी ती पार पडण्याची शक्यता आहे. जनगणनेच्या कामात शिक्षकांचे सुमारे पंचेचाळीस ते पन्नास दिवस जाणार असल्याचे प्रा. रवींद्र मोरे यांनी सांगितले. 

‘‘जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने हे काम शिक्षकांना करावे लागणार यात कोणतीही शंका नाही. मात्र, तरीही दहावी व बारावीच्या शिक्षकांना या कामातून सूट मिळावी. तरच परिक्षा घेणे सोपे जाईल. 
- प्रा. अनिल महाजन, (सचिव, नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com