Nashik News : घोटीत Railway Track बदलल्याने गोंधळ; वाहतूक ठप्प

Traffic News Nashik
Traffic News Nashikesakal

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी रेल्वे फाटक जवळ सोमवारी (ता.१९) सायंकाळी सातला हॉलिडे एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना अचानक ट्रॅक बदलला गेल्याने तयार झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे थांबविण्यात आली.

याचा त्रास मात्र नाहक गेटवर अडकून पडलेल्या वाहनचालक यांना झाला. ट्रॅक बदलला गेल्याने रेल्वे वाहतूक व घोटी मधून इतर गावांसाठी जाणारी वाहतूक खोळंबली होती. तब्बल दोन तास ही वाहतूक ठप्प होती. (Confusion due to change of Railway Track in Ghoti Traffic stopped in one and half hour Nashik News)

Traffic News Nashik
Nashik News : जिल्ह्यात 103 पशुपालकांना 27 लाखांचे अनुदान प्राप्त

नाशिकहून कल्याणकडे जाणारी वातानुकूलित सात डब्यांची ‘हॉलिडे एक्स्प्रेस’ सायंकाळी सातला घोटी रेल्वे स्टेशन सोडत इगतपुरीकडे निघाली असता घोटी-रामराम नगरला जोडल्या जाणाऱ्या रेल्वे फाटकाच्या मध्यभागी येताच रेल्वेने मुंबई कडील ट्रॅकला सोडून उजव्या बाजूच्या अर्थात विरुद्ध दिशेने मुंबईकडून नाशिकला जाणाऱ्या ट्रॅकवर गेली गेली.

सदरची चूक लक्षात येताच ही रेल्वे थांबविण्यात आली. मात्र याच दरम्यान समोरच्या विरुद्ध दिशेने एखादी ट्रेन आली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र अधिकाऱ्यांनी तत्काळ रेल्वे थांबविल्या. यामुळे दीड तास ट्रॅक बदलण्यात गेला. त्यामुळे फाटकावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Traffic News Nashik
Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

या गाड्यांवर झाला परिणाम

सदर घटनेमुळे इगतपुरी स्थानकावर तब्बल चार गाड्या खोळंबून पडल्या होत्या. यात एक नंबर प्लॅटफॉर्म वर लखनौ एक्स्प्रेस, दोनवर गोरखपूर एक्स्प्रेस, तीनवर नंदीग्राम एक्स्प्रेस, व घोटी येथे कामायनी एक्स्प्रेस थांबविण्यात आल्या. या घटनेनंतर मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तत्काळ काम सुरू करत रेल्वेचे इंजिन बदलण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

Traffic News Nashik
Nashik News : अखेर निसाकाचा भोंगा वाजला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com