Nashik : आनंदाच्या शिधा वितरणात connectivityचा अडसर

Diwali Festival News
Diwali Festival Newsesakal

नाशिक : सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशन दुकानात शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. तीन दिवसांपासून शिधा मिळायला सुरवात झाली असतानाच, आता ग्रामीण आदिवासी भागात इ पॉस यंत्रणांना रेंज मिळत नसल्याने शिधा वाटपात व्यत्यय येवू लागला आहे.

दोन दिवसांपासून शिधा वाटपात सुरळीतपणा आला आहे. मागणीच्या तुलनेत ८० टक्के किट प्राप्त झाल्याने सर्व तालुक्यांना शिधा पोचलेला आहे. शहरात आज नाशिक रेाड भागात वितरण सुरू झाले. सध्या ग्रामीण भागाला पुरवठा खात्याने प्राधान्य दिले आहे.(Connectivity Hindrance in Delivery of Happiness Rations Nashik News)

Diwali Festival News
Nashik : सिंहस्थ कुंभमेळा; नियोजन तेच, मात्र कागद नवा

बऱ्याच वर्षापासून रेशन दुकानातनात गहु, तांदूळ व साखरे शिवाय फारसे काही मिळत नव्हते. यंदा चार वस्तु नव्या मिळाल्याने व दुकानदारही ग्राहकांपर्यंत पोचविताना घरोघर आनंद पोहचत असल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीचा गोडवा वाढत असल्याचे चित्र असताना, रेंजची अडचण पुढे आली आहे. शिधा पुरवठ्यासाठी ज्या पॉस यंत्राद्वारे शिधा पुरविला जातो. त्या यंत्रांना ग्रामीण व आदिवासी भागात रेंजचा प्रॉब्लेम येत असल्‍याने व्यत्यय येत आहे.

शंभर रुपयात ४ वस्तु मिळत असल्याने दिलासा आहे. लिबर्टीचे तेल. रवा साखर, व चणाडाळ साखर यामुळे फऱाळाला मदत होत आहे. असल्याने यंदाची दिवाळी तशी गोड झाली आहे.पण ग्रामीण भागात मात्र रेंजच्या अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

Diwali Festival News
Nashik : सायकल Trackवर Parking केल्यास दंडात्मक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com